Home Bibles यिर्मया 6:3 · मराठी बायबल
यिर्मया 6:3 · मराठी बायबल

मेंढपाळ आपापले कळप घेऊन यरुशलेमला येतात. ते तिच्या सर्व बाजूंना तंबू ठोकतात. प्रत्येक मेंढपाळ स्वत:च्या कळपाची काळजी घेतो.

Cross references

2 राजे 24:2

यहोयाकीमविरुध्द परमेश्वराने बाबेल, अरामी, मवाबी आणि अम्मोनी लोकांच्या टोळ्या पाठवल्या. आपल्या संदेष्ट्यांकरवी परमेश्वराने जे जे घडेल म्हणून सांगितले होते त्याप्रमाणेच घडत होते. यूहदाच्या संहारासाठी या टोळ्या होत्या.

2 राजे 24:10

यावेळी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या कारभाऱ्यांनी यरुशलेमला वेढा दिला.

2 राजे 25:1

सिद्कीयाने बाबेलच्या राजाविरुध्द बंड केले आणि त्याच्या आज्ञा पाळण्याचे त्याने नाकारले. त्यामुळे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्या सैन्यासह यरुशलेमवर चाल करुन गेला. सिद्कीया राज्यावर आल्याचे ते नववे वर्ष, दहावा महिना, दहावा दिवस होता. नबुखद्नेस्सरच्या सैन्याने यरुशलेमला वेढा देऊन लोकांची ये जा रोखली. मग त्याने नगराभोवती कचऱ्याचे अडसर निर्माण केले.

यिर्मया 4:16

“ही बातमी ह्या देशाला कथन करा. यरुशलेमच्या लोकांत ही बातमी पसरवा दुरवरच्या देशांतून शत्रू येत आहेत. यहुदाच्या विरुद्ध ते युद्धाची घोषण करीत आहेत.

यिर्मया 4:17

शेताचे रक्षण करण्यासाठी लोक शेताभोवती कडे करतात तसा शत्रूने यरुशलेमला वेढा घातला आहे. यहूदा, तू माझ्याविरुद्ध गेलीस म्हणून शत्रू तुझ्याविरुद्ध चढाई करण्यास येत आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे.

यिर्मया 12:10

पुष्कळ मेंढपाळांनी (नेत्यांनी) माझ्या द्राक्षमळ्याचा नाश केला आहे. त्यांनी द्राक्षेवेली पायदळी तुडविल्या. त्यांनी माझ्या द्राक्षमळ्याचे वैराण वाळवंट केले.

यिर्मया 39:1

अशा रितीने यरुशलेमचा पाडाव झाला. यहूदाचा राजा सिद्कीया याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्यात बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपले संपूर्ण सैन्य घेऊन यरुशलेमवर चालून आला. नगरीचा पाडाव करण्यासाठी त्याने नगरीला वेढा घातला.

नहूम 3:18

अश्शूराच्या राजा आणि तुझे मेढपाळ (नेते) गाढ झोपले आहेत. ते सत्ताधारी लोक डुलक्या घेत आहेत. त्यामुळे तुझ्या मेंढ्या पर्वतांत भटकल्या आहेत. त्यांना परत आणायला कोणीही नाही.

लूक 19:43

तुझ्यावर असे दिवस येतील की, तुझे शत्रु तुझ्याभोवती कोट उभारतील. तुला वेढीतील, आणि सर्व बाजूंनी तुला कोंडीत पकडतील.

Interlinear

Choose Theme