बाहेर शेतात जाऊ नका. रस्त्यावर जाऊ नका. का? कारण शत्रूजवळ तलवारी आहेत आणि सगळीकडे धोका आहे.
Cross references
अनाथचा मुलगा शमगार याच्या आणि याएलच्या कारकिर्दीत राजमार्ग ओस पडले वाटसरुंचे तांडे आडवाटेने जाऊ लागले.
त्या धकाधकीच्या काळात कोणीही सुरक्षितपणे प्रवास करु शकत नव्हता. सगळ्याच देशामध्ये अराजकाची स्थिती होती.
दहशत चहुबाजूंनी त्याची वाट पाहात आहे. भीती त्याच्या प्रत्येक पावलावर पाठलाग करीत आहे.
लोक माझ्याबद्दल जे भयंकर बोलतात ते मी ऐकतो. ते लोक माझ्याविरुध्द गेले आहेत ते मला मारण्याची योजना आखत आहेत.
माझे म्हणणे न ऐकणे हे माझ्याविरूध्द जाण्यासारखे होईल आणि शत्रू तुमचा नाश करेल.”स्वत: परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या.
“यहूदाच्या लोकांना हा संदेश द्या. यरुशलेममधील प्रत्येकाला सांगा:‘सर्व देशभर रणशिंगे फुंका, मोठ्याने ओरडून सांगा, “एकत्र या. सुरक्षिततेसाठी आपण सर्व मजबूत शहराकडे जाऊ या.’
नंतर, मी, यिर्मया, म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू तू यहुदातील आणि यरुशलेममधील लोकांना खरोखरच युक्तीने फसविलेस. ‘तू त्यांना म्हणालास की तुम्हाला शांती मिळेल.’ पण आता, तू तलवारीचे पातेच त्यांच्या नरड्याला लावीत आहेस.”
“आपण येथे नुसतेच का बसलो आहोत? या भक्कम शहराकडे पळून जाऊ या, जर परमेश्वर आपला देव, आपल्याला मारणारच असेल तर आपण तेथेच मरु या. आपण परमेश्वराविरुद्ध वागून पाप केले. म्हणून देवाने आपल्याला विषारी पाणी प्यायला दिले.
आम्ही शांतीची आशा केली पण आम्हाला काहीच चांगले मिळाले नाही. तो आम्हाला क्षमा करील असे आम्हाला वाटले पण अरिष्टच आले.
मी जर त्या देशात गेलो, तर मला तलवारीने मारले गेलेले लोक दिसतील. मी जर शहरात गेलो, तर मला सर्वत्र दौर्बल्य आढळेल. कारण लोकांच्याजवळ अन्न नाही. याजकांना आणि संदेष्ट्यांना परदेशात नेले आहे.”‘
दुसऱ्या दिवशी पशहूरने यिर्मयाला खोड्यातून मोकळे केले, तेव्हा यिर्मया पशहूरला म्हणाला, “तुझे परमेश्वराने ठेवलेले नाव पशहूर नाही, तर ‘प्रत्येक बाजूला भय’ असे आहे.
लोक माझ्याबद्दल कुजबुजताना मी ऐकतो. सगळीकडून ज्या गोष्टी मी ऐकतो, त्याने मी घाबरतो इतकेच नाही, तर माझे मित्रही माझ्याविरुद्ध बोलतात. मी काहीतरी चूक करावी म्हणून लोक वाट पाहात आहेत. ते म्हणत आहेत, “आपण खोटे बोलू या आणि त्याने वाईट कृत्य केल्याचे सांगू या. यिर्मयाला फसविणे कदाचित् शक्य आहे. मग तो आपल्या हातात सापडेल व आपली त्याच्यापासून सुटका होईल. मग आपण त्याला पकडू आणि सूड घेऊ.”
हे मी काय पाहतो? ते सैन्य भयभीत झाले आहे, सैनिक दूर पळून जात आहेत त्यांच्या शूर वीरांचा पराभव झाला आहे. ते घाईने पळून जात आहेत. ते मागे वळून पाहत नाहीत. सगळीकडे धोका आहे.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
पण सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो: “मी सर्व बाजूंनी तुमच्यावर संकटे आणीन. तुम्ही सर्व पळून जाल आणि कोणीही तुम्हाला एकत्र आणू शकणार नाही.”
त्यांचे तंबू व कळप नेले जातील. त्यांचे तंबू व संपत्ती घेतली जाईल त्यांचा शत्रू त्यांचे उंट नेईल. लोक त्यांना ओरडून सांगतील. ‘आमच्याभोवती काहीतरी भयंकर घडत आहे.’
तू माझ्या सर्व बाजूंनी दहशत निर्माण केलीस. मेजवानीला एखाद्याला आमंत्रण द्यावे त्याप्रमाणे तू दहशतीला आमंत्रण दिलेस. परमेश्वराच्या कोपाच्या दिवशी कोणीही सुटला नाही. मी ज्यांना जन्म दिला व ज्यांचे लालनपासन केले. त्यांना माझ्या शत्रूने ठार केले.
ते शोकप्रदर्शक कपडे घालतील आणि अतिशय भयभीत होतील. प्रत्येक चेहरा लज्जित झालेला तुम्हाला दिसेल. दु:ख प्रकट करण्यासाठी ते आपली डोकी भादरतील.
“मग मीसुध्दा टाळी वाजवीन. मग माझा राग निवळेल. मी, परमेश्वर, हे बोललो आहे.”
तुझ्यावर असे दिवस येतील की, तुझे शत्रु तुझ्याभोवती कोट उभारतील. तुला वेढीतील, आणि सर्व बाजूंनी तुला कोंडीत पकडतील.