Home Bibles यिर्मया 6:21 · मराठी बायबल
यिर्मया 6:21 · मराठी बायबल

मग परमेश्वर पुढे असे म्हणतो: “मी यहूदाच्या लोकांपुढे अडचणी निर्माण करीन. त्या वाटेत असलेल्या दगडाप्रमाणे असतील. वाटेतल्या दगडाला अडखळून लोक पडतात, त्याप्रमाणे वडील व मुले अडखळून पडतील. मित्र आणि शेजारी मरतील.”

Cross references

2 इतिहास 36:17

तेव्हा बाबेलच्या राजाला देवाने यहूदा व यरुशलेमवर स्वारी कारयला लावले. बाबेलच्या राजाने मंदिरात असलेल्या तरुणांनाही ठार केले. यहूदा व यरुशलेममधील लोकांवर त्याने दयामाया दाखवली नाही. लोकांना जिवे मारताना तरुण-वृध्द, स्त्री-पुरुष, रोगी-निरोगी असा भेदाभेद बाळगला नाही. देवानेच नबुखद्नेस्सरला यहूदा व यरुशलेमच्या लोकांना शासन करायची मुभा दीली होती.

यशया 8:14

तु जर परमेश्वराचा मान राखलास, तो पवित्र आहे असे मानलेस, तर तो तुला अभय देईल, पण जर तू त्याचा अनादर केलास, तर देव रस्त्यावरील दगडाप्रमाणे होईल आणि तुम्ही लोक त्यावर ठेचकाळून पडाल. इस्राएलच्या दोन घराण्यांना तो दगड अडखळवतो. यरूशलेमच्या सर्व लोकांचा परमेश्वरच सापळा आहे.

यशया 8:15

(पुष्कळ माणसे ह्याच अडथळ्याला अडखळून पडतील व त्यांची हाडे मोडतील. ते सापळ्यात अडकतील व पकडले जातील.)

यशया 9:14

म्हणून परमेश्वर इस्राएलचे डोके व शेपूट कापून टाकील. एका दिवसात परमेश्वर फांदी व देठ कापून टाकील.

यशया 24:2

त्या वेळेला सामान्य लोक आणि याजक यांना एकाच मापाने मोजले जाईल. गुलाम व मालक हे सारखेच समजले जातील. दासी आणि मालकीण यांच्यात फरक केला जाणार नाही. खरीददार व विक्रेते, कर्ज घेणारे व कर्ज देणारे आणि धनको व ऋणको ह्यांत भेद केला जाणार नाही.

यिर्मया 9:21

‘मृत्यू आला आहे. तो चढून खिडक्यातून आना आला. मृत्यू राजवाड्यात आला. रस्त्यांवर खेळणाऱ्या आमच्या मुलांकडे आला. सार्वजनिक ठिकाणी जमणाऱ्या तरुणांकडे तो आला.’

यिर्मया 13:16

परमेश्वराचा, तुमच्या देवाचा मान राखा. त्याचे स्तवन करा, नाहीतर तो अंधकार पसरवील. अंधकारमय टेकड्यांवर पडण्याआधीच त्याचे स्तुतिस्तोत्र गा. तुम्ही यहूदाचे लोक प्रकाशाची वाट पाहता, पण परमेश्वर प्रकाशाचे गाढ अंधकारात रुपांतर करेल. तो प्रकाशाला दाट अंधारात बदलेल.

यिर्मया 15:2

ते लोक कदाचित् तुला विचारतील, ‘आम्ही कोठे जाऊ?’ तेव्हा तू त्यांना माझा पुढील संदेश दे परमेश्वर म्हणतो,‘काही लोकांना मी मरणासाठी निवडले आहे, ते मरतीलच. काही लोकांची निवड मी लढाईत मरण्यासाठी केली आहे, त्यांना तसेच मरण येईल. काहीना मी उपासमारीने मरण्यासाठी निवडले आहे; ते अन्नावाचून मरतील. काहीची निवड मी देशोधडीला लावण्यासाठीच केली आहे; त्यांना परदेशात कैदी म्हणून पाठविले जाईल.’

यिर्मया 16:3

यहूदामध्ये जन्मणाऱ्या मुलांबद्दल आणि त्यांच्या आईवडिलांबद्दल परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो,

यिर्मया 18:21

म्हणून दुष्काळात त्यांच्या मुलांची उपासमार होऊ देत. त्यांचे शत्रू तलवारीने त्यांचा पराभव करु देत. त्यांच्या बायका वांझ होऊ देत. यहूदातील पुरुषांना मृत्यू येऊ देत. त्यांच्या बायकांना विधवा कर युद्धात तेथील तरुण मारले जाऊ देत.

यिर्मया 19:7

येथेच मी यहूदातील व यरुशलेममधील रचलेले बेत हाणून पाडीन. त्या लोकांचा शत्रू पाठलाग करतील. मी ह्या ठिकाणी यहूदातील लोकांना तलवारीच्या घावांनी मरु देईन. त्यांची प्रेते गिधाडे व वन्य पशू ह्यांचे भक्ष्य होईल.

यिर्मया 21:7

असे घडल्यावर,” हा परमेश्वराचा संदेश आहे, ‘मी यहूदाचा राजा सिद्कीया याला, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या स्वाधीन करीन. मी सिद्कीयाच्या अधिकाऱ्यानासुद्धा नबुखदनेस्सरच्या हवाली करीन. यरुशलेममधील काही लोक भयंकर रोगराई अथवा लढाई वा उपासमार याने मरणार नाहीत. पण त्या सर्वांना मी नबुखद्नेस्सरच्या ताब्यात देईन. मी यहूदाच्या शत्रूला विजयी करीन. नबुखद्नेस्सरच्या सैन्याला यहूदातील लोकांना ठार मारायचे आहे म्हणून यहूदातील व यरुशलेममधील लोक तलवरीच्या घावाने मारले जातील. नबुखद्नेस्सर त्या लोकांना अजिबात दया दाखविणार नाही व त्यांच्याबद्दल त्याला दु:खही वाटणार नाही.’

विलापगीत 2:20

परमेश्वरा, माझ्याकडे बघ! तू अशा रीतीने जिला वागविलेस ती कोण आहे ते तरी पाहा! मला तुला एक प्रश्न विचारू दे: स्त्रियांनी पोटच्या मुलांना, खावे काय? ज्या मुलांची त्यांनी काळजी काळजी घेतली त्यांना स्त्रियांनी खावे काय? परमेश्वराच्या मंदिरात धर्मगुरु व संदेष्टे मारले जावेत का?

यहेज्केल 3:20

“किंवा एखादा सज्जन चांगले वागणे सोडून देईल. मी त्याच्या मार्गात असे काही ठेवीन की तो पडेल (पाप करील). तो दुष्कृत्ये करायला लागेल, म्हणून मरेल. तो पाप करीत होता व तू त्याला सावध केले नाहीस म्हणून तो मरेल. अशा वेळी त्याच्या मृत्यूबद्दल मी तुला जबाबदार धरीन. त्याने केलेली चांगली कृत्ये लोक विसरुन जातील.

यहेज्केल 5:10

यरुशलेममधील लोक उपासमारीने एवढे हैराण होतील की आईवडील मुलांना व मुले आईवडीलांना खातील. मी अनेक मार्गांनी तुम्हाला शिक्षा करीन. ज्यांना मी जिवंत ठेवलंय त्यांना मी सगळीकडे पसरवीन.”

यहेज्केल 9:5

मग देव इतरांशी बोलताना मी ऐकले, “तुम्ही त्या माणसाच्या मागे जावे. ज्यांच्या कपाळावर खूण नाही त्यांना तुम्ही ठार केलेच पाहिजे. मग ते वडीलधारी (नेते) असोत वा तरुण तरुणी असोत किंवा मुले व त्यांच्या आया असोत. कपाळावर खूण नसलेल्या प्रत्येकाला तुम्ही मारलेच पाहिजे. अजिबात दया दाखवू नका. कोणाचीही कीव करु नका. माझ्या मंदिरापासूनच सुरवात करा.” मग त्यांनी मंदिरा समोर असलेल्या वडील धाऱ्यांपासूनच (नेत्यांपासूनच) सुरवात केली.

रोमकरांस 9:33

पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे.“पाहा मी सीयोनात अडखळण्याचा दगड आणि अपाय करणारा खडक ठेवतो. परंतु जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.

रोमकरांस 11:9

दाविद म्हणतो, “त्यांचे मेज त्यांस सापळा आणि फास होवो. त्यांचे पतन होवो आणि त्यांना अपराधाबद्दल शिक्षा व प्रायश्चित मिळो.

1 पेत्र 2:8

तो असा झाला, “एक धोंडा जो लोकांना अडखळवितो आणि एक खडक जो लोकांना पाडतो.”

Interlinear

Choose Theme