त्यांची घरे दुसऱ्यांना दिली जातील. त्यांची शेते व त्यांच्या बायका दुसऱ्यांना दिल्या जातील. मी माझा हात उगारीन आणि यहूदातील लोकांना शिक्षा करीन.” हा परमेश्वराचा संदेश होता.
Cross references
“तुमचे जिच्याशी लग्न ठरले आहे, तिचा उपभोग दुसरा कोणी घेईल. तुम्ही घर बांधाल पण त्यात राहणार नाही. द्राक्षमळा लावाल पण त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही.
तुम्ही द्राक्षमळा लावून त्यात खूप मेहनत कराल. पण द्राक्षं किंवा द्राक्षारस तुम्हाला मिळणार नाही. कारण कीड ते खाऊन टाकील.
दावीदाने वर पाहिले तेव्हा त्याला परमेश्वराचा दूत आकाशात उभा असलेला दिसला. त्याने आपली तलवार यरुशलेम नगरावर उपसलेली होती. दावीद आणि पुढाऱ्यांनी नम्रपणे वाकून अभिवादन केले. या सर्वांनी दुखववड्याच्या वेळी घालतात तसे शोक प्रदर्शित करणारे कपडे घातलेले होते.
म्हणून परमेश्वर त्यांच्यावर रागावला आहे. तो आपला हात त्यांच्यावर उगारेल आणि त्यांना शिक्षा करील. मग डोंगरसुध्दा भीतीने कापतील. मृतदेह कचऱ्याप्रमाणे रस्त्यावर पडतील. पण तरीही देवाचा राग शांत होणार नाही. त्याचा हात लोकांना शिक्षा करण्याकरीता उगारलेलाच राहील.
परमेश्वर पूर्वेकडून अरामी लोकांना व पश्चिमेकडून पलिष्ट्यांना आक्रमण करायला लावील. हे शत्रू आपल्या सैन्यबळावर इस्राएलचा पराभव करतील. पण एवढे झाले तरी परमेश्वराचा इस्राएलवरचा राग शांत होणार नाही. परमेश्वर लोकांना आणखी शिक्षा करण्याच्या विचारात असेल.
सर्वच लोक पापी आहेत. म्हणून परमेश्वर तरूणांवर प्रसन्न नाही आणि परमेश्वर त्यांच्या विधवांवर व अनाथांवरही दया करणार नाही. ते सर्व देव सांगतो त्याच्या विरूध्द वागतात. ते खोटे बोलतात. त्यामुळे देवाचा क्रोध शमणार नाही. व देव त्यांना शिक्षा करीतच राहील.
(मनश्शे एफ्राईमशी आणि एफ्राईम मनश्शेशी लढेल व नंतर दोघेही युहदाच्या विरोधात उभे राहतील.)परमेश्वर अजूनही इस्राएलवर रागावला आहे. तो तेथील लोकांना शिक्षा करण्याच्या तयारीत आहेत.
कैद्याप्रमाणे तुम्हाला वाकावे लागेल, मृताप्रमाणे तुम्हाला जमिनीवर पडावे लागेल. पण एवढ्यानेही भागणार नाही. कारण अजूनही देवाचा राग शांत झाला नसेल. अजूनही देव शिक्षा करण्याच्या तयारीत असेल.
“त्या नगरीत घर बांधणाऱ्याला त्या घरात राहायला मिळेल. आणि द्राक्षाचा मळा लावणाऱ्याला त्या मळ्यातील द्राक्षे खायला मिळतील.
म्हणून मी त्यांच्या बायका दुसऱ्यांना देईन. त्यांची शेते नव्या मालकांना देईन. इस्राएलमधल्या सर्व लोकांना जास्तीच जास्त पैसा पाहिजे. अती महत्वाचे व अति सामान्य सर्व सारखेच आहेत. संदेष्ट्यांपासून याजकांपर्यंत सर्व खोटे बोलतात.
यहूदाच्या राजवाड्यात मागे राहिलेल्या सर्व स्त्रियांना बाबेलच्या राजाच्या मुख्य अधिकाऱ्यांपुढे आणले जाईल. त्या स्त्रिया पुढील गाणे गाऊन तुमची चेष्टा करतील.तुमच्या चांगल्या मित्रांनी तुम्हाला चुकीच्या मार्गाने नेले, आणि ते तुमच्याहून बलवान झाले, तेच ते मित्र ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला. तुमचे पाय चिखलात रुतलेत. तुमच्या मित्रांनी तुम्हाला सोडले.’
शत्रूप्रमाणे परमेश्वराने धनुष्याला बाण लावला. त्याने स्वत:ची तलवार उजव्या हातात धरली. यहूदाचा शत्रू असल्याप्रमाणे देवाने यहूदातील देखण्या पुरुषांना ठार केले. सियोनच्या तंबूवर परमेश्वराने आपला राग ओकला.
सियोनकन्येची तटबंदी नष्ट करण्याचा परमेश्वराने बेत केला. तट कोठे फोडायचा हे दाखविण्यासाठी ओळंब्याने त्याने खूण केली. नाश थांबविण्यासाठी त्यांने स्वत:ने काही केले नाही. म्हणून त्याने सर्व तटांना शोक करण्यास भाग पाडले. त्या सर्व ओस पडल्या.
परमेश्वराने त्याचा हात माझ्याविरुध्द केला. दिवसभर, त्याने आपला हात, पुन्हा पुन्हा, माझ्याविरुद्ध चालविला.
आमचा देश परक्यांच्या हातात गेला आहे. आमची घरे परदेशीयांना दिली गेली आहेत.
आम्ही अनाथ झालो. आम्हाला वडील नाहीत. आमच्या आयांची स्थिती विधवांसारखी झाली आहे.
शत्रूंनी सियोनमधील स्त्रियांवर बलात्कार केला. यहुदातील गावांमधील स्त्रियांवर त्यांनी बलात्कार केले.
मी दुसऱ्या राष्ट्रांतून दुष्ट लोक आणीन. ते इस्राएलच्या लोकांची सर्व घरे बळकावतील. तुमचे गर्वाचे घर मी खाली करीन. तुमची पूजास्थाने दुसऱ्या राष्ट्रांतील लोक ताब्यात घेतील.
मग इतर लोक त्यांची संपत्ती बळकावतील आणि त्यांच्या घरांचा नाश करतील. त्या वेळी, ज्यांनी घरे बांधली, ते त्या घरात राहणार नाहीत आणि ज्यांनी द्राक्षमळे लावले, त्यांना त्या द्राक्षांचा द्राक्षारस मिळणार नाही. ह्या गोष्टी दुसऱ्यांनाच मिळतील.”