Home Bibles यिर्मया 50:37 · मराठी बायबल
यिर्मया 50:37 · मराठी बायबल

तलवारी, बाबेलचे घोडे व रथ नष्ट कर. दुसऱ्या देशांतून आणलेल्या भाडोत्री सैनिकांना मार. ते सैनिक अतिशय घाबरलेल्या स्त्रियांप्रमाणे भयभीत होतील. तलवारी, बाबेलच्या संपत्तीचा नाश कर. ती संपत्ती लुटली जाईल.

Cross references

स्तोत्रसंहिता 20:7

काही लोक त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात आणि काही आपल्या सैन्यावर विश्वास ठेवतात परंतु आम्ही परमेश्वराच्या, आमच्या देवाच्या नावावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या नावाचा धावा करतो.

स्तोत्रसंहिता 46:9

परमेश्वर पृथ्वीवर कुठेही युध्दे थांबवू शकतो तो सैनिकांचे धनुष्य मोडून त्यांचे भाले तोडू शकतो तो त्यांचे रथ आगीत जाळू शकतो.

स्तोत्रसंहिता 76:6

याकोबाचा देव त्या सैनिकांवर ओरडला आणि ते सैन्य त्यांचा रथ आणि घोडे यांच्यासकट मरुन पडले.

यशया 19:16

त्या वेळी मिसरवासी घाबरलेल्या बायकांसारखे दिसतील. ते सर्वशक्तिमान परमेश्वराला भितील. देव शिक्षा करण्यासाठी हात उगारील व त्यांची घाबरगुंडी उडेल.

यशया 45:3

तुला मी अंधारातून वाचविणारी संपत्ती देईन. मी तुला गुप्त धन देईन. मीच परमेश्वर आहे, हे तुला कळावे म्हणून मी हे करीन. मी इस्राएलचा देव आहे, व मी तुला नावाने हाका मारत आहे.

यिर्मया 25:20

मी सर्व अरब व ऊस देशातील राजे यांनाही द्राक्षरस पिण्यास दिला. मी पलिष्ट्यांच्या देशातील अश्कलोन, गज्जा, एक्रोन या शहरांतील व अश्दोद शहरामधील उरलेले अशा सर्व राजांना त्या प्याल्यातून द्राक्षरस पिण्यास भाग पाडले.

यिर्मया 25:24

अरबस्तानातील सर्व राजांनाही मी द्राक्षरस प्यायला दिला. हे राजे वाळवंटात राहतात.

यिर्मया 48:41

मवाबची शहरे काबीज केली जातील. लपण्याच्या भक्कम जागांचा पाडाव होईल. त्या वेळी, मवाबचे सैनिक, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे भयभीत होतील.

यिर्मया 50:10

शत्रू खास्द्यांची सर्व संपत्ती घेतील. सैनिक त्यांना पाहिजे ते लुटून नेतील.” परमेश्वरानेच ह्या गोष्टी सांगितल्या.

यिर्मया 50:26

दूरवरुन बाबेलवर चालून या. तिची धान्याची कोठारे फोडा. बाबेलचा संपूर्ण नाश करा. कोणालाही जिवंत सोडू नका. धान्याच्या राशीप्रमाणे प्रेतांच्या राशी घाला.

यिर्मया 51:21

तुझा उपयोग मी घोडे आणि स्वार, रथ आणि सारथी ह्यांचा नाश करण्यासाठी केला.

यिर्मया 51:30

बाबेलच्या सैनिकांनी लढाई थांबवली आहे. ते त्यांच्या किल्ल्यांतच राहिले आहेत. त्यांची शक्ती संपली आहे ते बायकांप्रमाणे घाबरुन गेले आहेत. बाबेलमधील घरे जळत आहेत. तिच्या वेशीच्या दारांचे अडसर मोडले आहेत.

यहेज्केल 30:5

“खूप लोकांनी मिसरबरोबर शांतता करार केला. पण ते सर्व म्हणजे कुशी पूटी लूदी, अरेबिया येथील लोक, मिश्र जाती, कूबी आणि इस्राएल लोक यांचा नाश होईल.

यहेज्केल 39:20

माझ्या टेबलावर तुम्हाला खाण्यासाठी भरपूर मांस असेल. तेथे घोडे, सारथी, शक्तिशाली सैनिक आणि इतर लढवय्ये असतील.” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या.

नहूम 2:2

परमेशवर इस्राएलच्या वैभवाप्रमाणेच याकोबलाही पुन्हा वैभव प्राप्त करून देईल इस्राएलच्या ऐश्वर्याप्रमाणेच याकोबचे ऐश्वर्य होईल शत्रूने त्यांचा नाश केला आणि त्याचे द्राक्षमळे उदध्वस्त केले.

नहूम 2:13

सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो निनवे मी तुझ्याविरुध्द आहे मी तुझे रथ जाळून टाकीन लढाईत मी तुझ्या छाव्यांना ठार मारीन तू पुन्हा पृथ्वीवर कोणाचीही शिकार करणार नाहीस तुझ्या दूतांकडून पुन्हा कधीही लोकांना वाईट बातमी ऐकावी लागणार नाही.

नहूम 3:13

निनवे, तुझे सर्वलोक स्त्रियांप्रमाणे आहेत. आणि शत्रुसैनिक त्यांना नेण्यासाठी टपले आहेत. तुझ्या देशआची दारे, शत्रुंसाठी, सताड डघडली आहेत. दारांचे लाकडी अडसर आगीत जळले आहेत.

हाग्गय 2:22

मी पुष्कळ राजे आणि राज्ये उलथवून टाकीन. त्या दुसऱ्या लोकांच्या राज्यसत्तेचा मी नाश करीन. मी त्यांच्या रथांचा व सारथ्यांचा नाश करीन. आता त्या सैन्यांमध्ये मैत्री आहे. पण ते एकमेकांविरुध्द उठातील आणि तलवारीने एकमेकांना मारतील.

Interlinear

Choose Theme