Home Bibles यिर्मया 50:18 · मराठी बायबल
यिर्मया 50:18 · मराठी बायबल

म्हणून सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “मी लवकरच बाबेलच्या राजाला व त्याच्या देशाला शिक्षा करीन. अश्शुरच्या राजाला केली तशीच बाबेलच्या राजाला मी शिक्षा करीन.

Cross references

अनुवाद 32:41

माझी लखलखाती तलवार परजून मी शत्रूंना शासन करीन. ते याच शिक्षेला पात्र आहेत.

यशया 10:12

सीयोनचा डोंगर व यरूशलेम यांच्याबाबतीत योजलेल्या गोष्टी माझा परमेश्वर पार पाडील. नंतर तो अश्शूरला शिक्षा करील. अश्शूरचा राजा फार गर्विष्ठ आहे. त्याच्या अहंकारामुळे त्याने अनेक दुष्कृत्ये केली आहेत. म्हणून परमेश्वर त्याला शिक्षा करील.

यशया 37:36

मग परमेश्वराच्या दूताने जाऊन अश्शूरच्या तळावरील 185,000 माणसांना ठार मारले. सकाळी उठून लोक पाहतात तो त्यांच्या सभोवती प्रेते पडलेली.

यिर्मया 27:7

सर्व राष्ट्रे, नबुखद्नेस्सर, त्याचा मुलगा आणि नातू ह्यांचे दास्य करतील. मग बाबेलच्या पराभवाची वेळ येईल. खूप राष्ट्रे आणि मोठे राजे बाबेलला त्याचा दास करतील.

यहेज्केल 31:3

अश्शूर सुंदर फांद्या असलेल्या व गर्द छाया असलेल्या लबानोनमधील उंच गंधसरुसारखा होता. त्याचा शेंडा ढगांना भिडला होता.

नहूम 1:1

हे पुस्तक म्हणजे एल्कोश येथील नहूमला झालेला दृष्टांन्त आहे. निनवेया शहराबद्दलचा हा शैंकसंदेश आहे.

हबक्कूक 2:8

तू पुष्कळ राष्ट्रांतून बऱ्याच गोष्टी चोरल्यास. ते लोक तुझ्याकडून त्यांची वसुली करतील. तू पुष्कळ लोकांना ठार मारलेस, देश व गावे यांचा नाश केलास. त्या देशांतील व गावांतील लोकांना मारलेस.

सफन्या 2:13

नंतर परमेश्वर उत्तरेकडे वळेल, अश्शूरला शिक्षा करील. तो निनवेचा नाश करील. ते शहर म्हणजे ओसाड, रुक्ष वाळवंट होईल.

Interlinear

Choose Theme