Home Bibles यिर्मया 5:23 · मराठी बायबल
यिर्मया 5:23 · मराठी बायबल

पण यहूदाचे लोक दुराग्रही आहेत. ते नेहमीच माझ्याविरुद्ध जाण्यासाठी मार्ग आखत असतात. ते माझ्यापासून दूर गेले आणि त्यांनी माझा त्याग केला.

Cross references

अनुवाद 21:18

“एखाद्याचा मुलगा हट्ठी अजिबात न ऐकणारा, आईबापांना न जुमानणारा निघतो. शिक्षा केली तरी काही फरक पडत नाही.

अनुवाद 31:27

तुम्ही फार ताठर आहात हे मला माहीत आहे. तुम्ही आपलाच ठेका चालवता. मी तुमच्याबरोबर असतानाही तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड केले आहे. तेव्हा माझ्यामागेही तुम्ही तेच कराल.

स्तोत्रसंहिता 95:10

मी त्या लोकांच्या बाबतीत चाळीस वर्षे सहनशील राहिलो आणि ते प्रमाणिक नव्हते हे मला माहीत आहे. त्या लोकांनी माझी शिकवण आचरणात आणायचे नाकारले.

यशया 1:5

देव म्हणतो, “मला तुम्हाला सतत शिक्षा का करावी लागावी? मी तुम्हाला शिक्षा केली तरी तुम्ही सुधारत नाही. तुम्ही माझ्याविरूध्द बंड करीतच राहता. सध्या प्रत्येकाचे डोके व हृदय कमकुवत झाले आहे.

यशया 31:6

इस्राएलच्या मुलांनो, तुम्ही देवाच्याविरूध्द गेलात. तुम्ही देवाकडे परत यावे.

यिर्मया 5:5

म्हणून मी यहुदाच्या नेत्यांकडे जाऊन त्यांच्याशी बोलेन. नेत्यांना परमेश्वराच्या चालीरिती नक्कीच माहीत असतात. त्यांना त्यांच्या देवाचे नियम माहीत असतात. ह्याची मला खात्री आहे!” पण परमेश्वराच्या सेवेतून मुक्त होण्यासाठी सर्व नेते एकत्र जमले होते.

यिर्मया 6:28

माझे लोक माझ्याविरुद्ध गेले आहेत आणि ते दुराग्रही आहेत. ते लोकांबद्दल खोट्या गोष्टी बोलतात. ते सर्व दुष्ट आहेत. ते गंजलेल्या व कलंकित झालेल्या जस्त वा लोखंडाप्रमाणे आहेत.

यिर्मया 17:9

“माणसाचे मन फार कपटी असते. त्याच्यावर काही औषध नाही. म्हणूनच कोणालाही मनाचे खरे आकलन होत नाही.

होशेय 4:8

“लोकांच्या पापांमध्ये याजक सहभागी झाले. त्यांना ती पापे आणखी पाहिजे आहेत.

होशेय 11:7

“मी परत यावे अशी माझ्या लोकांची अपेक्षा आहे. वरच्या परमेश्वराला ते बोलवतील पण देव त्यांना मदत करणार नाही.”

इब्री लोकांस 3:12

सावध असा, बंधूंनो, तुमच्यापैकी कोणाचीही अंत:करणे दुष्ट व अविश्वासू असू नयेत, ती जिवंत देवापासून दूर नेतात.

Interlinear

Choose Theme