दिमीष्क दुबळे झाले आहे. लोकांना पळून जायचे आहे. लोक भीतिग्रस्त होण्याच्या बेतात आहेत. प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे लोकांना यातना व वेदना होत आहेत.
Cross references
नंतर परमेश्वर स्त्रीला म्हणाला,“तू गरोदर असताना तुला त्रास होईल आणि मुलांना जन्म देते वेळी तुला खूप वेदना होतील. तरी तुझी ओढ तुझ्या नवऱ्याकडे राहील; आणि तो तुझ्यावर अधिकार चालवील.”
स्त्री प्रसूतिवेदना होताना ओरडते, तसा आवाज मी ऐकतो. पहिल्या बाळंतपणाच्या वेळेला स्त्री ज्याप्रमाणे किंकाळी फोडते, तशीच ती किंकाळी आहे. हा सियोनकन्येचा आवाज आहे. ती प्रार्थनेसाठी हात जोडत आहे. ती म्हणत आहे, “हे देवा, मी चक्कर येऊन पडण्याच्या बेतात आहे. खुन्यांनी मला घेरले आहे!”
त्या सैन्याची बातमी आम्ही ऐकली आहे. आम्ही भीतीने गर्भगळीत झालो आहोत. आम्ही अडचणीत सापडलो आहोत असे वाटते. प्रसूती होणाऱ्या स्त्रीप्रमाणे आमची स्थिती झाली आहे.
“पुढील प्रश्न विचारा व त्यांचा विचार करा. पुरुषाला मूल होऊ शकेल का? अर्थात् नाही मग प्रत्येक पुरुष प्रसूतिवेदना होणाऱ्या बाई प्रमाणे पोट धरताना का दिसत आहे? प्रत्येकाचा चेहरा मृताप्रमाणे पांढराफटक का पडला आहे? का? कारण ते फार घाबरले आहेत.
मवाबची शहरे काबीज केली जातील. लपण्याच्या भक्कम जागांचा पाडाव होईल. त्या वेळी, मवाबचे सैनिक, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे भयभीत होतील.
हेरलेल्या सावजावर घिरटया घालणाऱ्या गरुडाप्रमाणे परमेश्वर आहे. परमेश्वर, गरुडाप्रमाणे, आपले पंख बसऱ्यावर पसरेल. त्या वेळी अदोमचे सैनिक फार भयभीत होतील प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे शूर सैनिक भीतीने रडतील.
त्यांचे तंबू व कळप नेले जातील. त्यांचे तंबू व संपत्ती घेतली जाईल त्यांचा शत्रू त्यांचे उंट नेईल. लोक त्यांना ओरडून सांगतील. ‘आमच्याभोवती काहीतरी भयंकर घडत आहे.’
एलामचे त्याच्या शत्रूसमोर मी तुकडे तुकडे करीन. जे लोक त्याला ठार करु इच्छितात, त्यांच्यासमोर मी एलामला मोडीन. मी त्यांच्यावर भयंकर संकटे आणीन. मी कित्ती रागावलो आहे, हे त्यांना दाखवून देईल.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.“एलामचा पाठलाग करायला मी तलवार पाठवीन. मी त्या सर्वांना ठार करेपर्यंत, ती त्यांचा पाठलाग करील.
बाबेलच्या राजाने ह्या सैन्याबद्दल ऐकले, आणि तो फारच घाबरला. भीतीने त्याचे हातपाय गळून गेले. प्रसून्न होणाऱ्या स्त्रीप्रमाणे त्याला कष्ट झाले.”
त्याची शिक्षा प्रसूतिवेदनांप्रमाणे असेल. तो सुज्ञ मुलगा नसेल त्याची जन्मवेळ येईल, तेव्हा तो वाचणार नाही.
एक राष्ट्रदुसऱ्या राष्टावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल, निरनिराळ्या ठिकाणी धरणीकंप होतील आणि दुष्काळ होतील. पण या गोष्टी म्हणजे नाशाची सुरूवात आहे.