Home Bibles यिर्मया 48:28 · मराठी बायबल
यिर्मया 48:28 · मराठी बायबल

मवाबवासीयांनो, तुमची गावे सोडा, जाऊन कडेकपारीत राहा गुहेच्या तोंडाशी घरटे करणाऱ्या पारव्यांप्रमाणे व्हा.”

Cross references

शास्ते 6:2

मिद्यानचे लोक बलशाली होतेच, पण इस्राएल लोकांशी क्रौर्यानेही वागत. तेव्हा इस्राएल लोकांनी लपून बसण्यासाठी डोंगरांमध्ये गुहा केल्या. गुहांमध्ये आणि दुर्गम अशा ठिकाणी ते अन्नधान्य ठेवत.

1 शमुवेल 13:6

आता आपण संकटात सापडले आहोत, पुरते पलिष्ट्यांच्या कचाट्यांत सापडलो आहोत हे इस्राएलांच्या लक्षात आले. ते गुहांमध्ये आणि खडकांच्या कपारीत लपून बसले. विवर, विहिरी यात त्यांनी आश्रय घेतला.

स्तोत्रसंहिता 55:6

मला कबूतरासारखे पंख असते तर किती बरे झाले असते. मी उडून विश्रांतीसाठी एखादी जागा शोधली असती.

गीतरत्न 2:14

माझ्या कबुतरा, उंच कड्यावरच्या गुहेत लपलेल्या, पर्वतात लपलेल्या माझ्या कबुतरा, मला तुला बघू दे. तुझा आवाज ऐकू दे. तुझा आवाज अतिशय गोड आहे आणि तू खूप सुंदर आहेस.

यशया 2:19

लोक कडेकपारीच्या मागे व जमिनीच्या भेगांत लपून बसतील. लोकांना परमेश्वर व त्याचे सामर्थ्य ह्यांचे भय वाटेल. जेव्हा परमेश्वर भूकंप घडवून आणील तेव्हा हे असे घडेल.

यिर्मया 48:9

मवाबच्या शेतांवर मीठ पसरा. देशाचे ओसाड वाळवंट होईल. मवाबची शहरे निर्जन होतील. तेथे कोणीही राहणार नाही.

यिर्मया 49:8

ददानच्या लोकांनो, पळा! लपा! का? कारण मी एसावाला त्याने केलेल्या दुष्कृत्याबद्दल शिक्षा करीन.

यिर्मया 49:16

अदोम, तू दुसऱ्या राष्ट्रांना घाबरविलेस! म्हणून तू स्वत:ला श्रेष्ठ समजलास! पण तू मूर्ख बनलास! तुझ्या गर्वाने तुला फसविले. अदोम, तू डोंगरात उंचावर राहतोस मोठ्या दगड धोंड्यांनी सुरक्षित केलेल्या जागी तू राहतोस पण जरी तू गरुडाच्या घरट्याप्रमाणे उंच घर बांधलेस तरी मी तुला पकडून खाली खेचून आणीन.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.

ओबद्या 1:3

तुझ्या गर्वाने तुला मूर्ख बनविले. उंच कड्यावरील गुहांत तू राहतोस. तुझे घर टेकडीवर उंच ठिकाणी आहे. म्हणून स्वत:शी म्हणतोस, ‘मला कोणीही खाली जमिनीवर आणू शकत नाही.”‘

Interlinear

Choose Theme