परमेश्वराने यिर्मया या संदेष्ट्याला जो संदेश दिला, तो मिसरवर स्वारी करुन येणाऱ्या बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरबद्दल होता.
Cross references
मिसरबद्दल शोक संदेश पाहा, परमेश्वर, जलद गतीने जाणाऱ्या मेघावर आरूढ होऊन येत आहे. देव मिसरमध्ये प्रवेश करील आणि तेथील खोटे देव भीतीने थरथर कापू लागतील. मिसर खरा धैर्यवान होता पण त्याचे धैर्य गरम मेणाप्रमाणे वितळून जाईल.
देव म्हणतो, “अरीएलकडे पाहा. तेथे दाविदाने तळ ठोकला होता. त्या शहराची सुटी वर्षानुवर्षे सुरूच आहे.
मग हे सर्व पाहत असलेल्या यहूदी लोकांना सांग ‘सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “मी बाबेलचा राजा, नबुखद्नेस्सर, यास येथे पाठवीन, तो माझा सेवक आहे. मी पुरलेल्या ह्या दगडांवर मी त्याचे सिंहासन ठेवीन, तो ह्या दगडावर त्याचे छत्र उभारील.
नबुखद्नेस्सर येथे येईल व मिसरवर चढाई करील. ज्यांचे मरण आहे, त्यांना तो ठार मारील. ज्यांना कैद व्हायची आहे, त्यांना तो कैद करील. ज्यांचे मरण तलवारीने आहे, त्यांना तो तलवारीने ठार करील.
मी म्हटल्याप्रमाणे करतो हाच तुमच्यासाठी पुरावा असेल.’ परमेश्वर पुढे म्हणतो, ‘फारो हफ्रा हा मिसरचा राजा आहे. त्याचे शत्रू त्याला मारायला टपले आहेत. मी फारो हफ्राला त्याच्या शत्रूंच्या ताब्यात देईन. सिद्कीया यहूदाचा राजा होता नबुखदनेस्सर त्याचा शत्रू होता, मी सिद्कीयाला त्याच्या शत्रूच्या ताब्यात दिले त्याचप्रमाणे फारो हफ्राला मी त्याच्या शत्रूच्या ताब्यात देईल.”