तुम्ही असे म्हणत असाल तर यहूदातील वाचलेल्या लोकांनो, परमेश्वराचा संदेश ऐका. सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांना देव म्हणतो, ‘तुम्ही मिसरमध्ये जाऊन राहण्याचे निश्र्चित केल्यास पुढील गोष्टी घडतील.
Cross references
याकोब आपली बायकांमुले व सर्व चीजवस्तू घेऊन ताबडतोब निघाला; त्यांनी फरात नदी ओलांडली आणि ते गिलाद डोंगराळ प्रदेशाकडे निघाले.
त्याने स्वत:साठी अधिकाधिक घोडे बाळगता कामा नयेत. घोडदळ वाढवण्यासाठी त्याने मिसरमध्ये माणसे पाठवता कामा नयेत. कारण, ‘तुम्ही पुन्हा माघारी फिरता कामा नये,’ असे परमेश्वराने बजावले आहे.
जो कोणी मिसरमध्ये जाऊन राहण्याचे निश्र्चित करील, तो युद्धात, वा उपासमारीने किंवा भयंकर रोगराईने मरेल. मिसरमध्ये जाणारा एकही जण वाचणार नाही. मी घडवून आणणार असलेल्या भयंकर संकटातून कोणीही वाचणार नाही.’
यहूदातील अगदी थोडे लोक वाचले आहेत. ते येथे मिसरला आले आहेत. पण यहूदातील कुळातल्या त्या वाचलेल्या लोकांचा मी नाश करीन. अती महत्वाच्या व्यक्तीपासून अती सामान्यपर्यंत सर्वच्या सर्व युद्धात ठार होतील वा उपासमारीने मरतील. इतर राष्ट्रांतील लोक त्यांची निंदा करतील. त्या लोकांच्या बाबतीत जे घडले, ते पाहून इतर राष्ट्रांतील लोक घाबरतील. ते लोक म्हणजे जणू काय शिवी बनतील, दुसरी राष्ट्रे त्यांचा अपमान करतील.
मिसरमध्ये राहण्यास गेलेल्या त्या लोकांना मी शिक्षा करीन. त्यासाठी मी तलवार, उपासमार व भयंकर रोगराई या गोष्टींचा उपयोग करीन. यरुशलेम नगरीला जशी मी शिक्षा केली, तशीच त्यांना शिक्षा करीन.
अल.17उत्तरेचा राजा दक्षिणेच्या राजाविरुध्द लढण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावण्याचा निश्चय करील. तो दक्षिणेच्या राजाबरोबर एक करार करिल.तो आपाल्या एका मुलीचे लग्न दक्षिणेच्या राजाशी लवून देईल. दक्षिणेच्या राजाचा पराभव करण्यासाठी तो असे करिल, पण त्याच्या बेत यसस्वी होणार नाही. त्याच्या येजनांची त्याला मदत होणार नाही.
आता असे घडले की, जेव्हा त्याला स्वर्गात घेण्याची वेळ आली, त्याने यरुशलेमाला जाण्याचे ठरविले.