Home Bibles यिर्मया 41:4 · मराठी बायबल
यिर्मया 41:4 · मराठी बायबल

गदल्याला मारल्याच्या दुसऱ्या दिवशी 80 लोक मिस्पाला आले ते परमेश्वराच्या मंदिरात अर्पण करण्यासाठी धान्य व धूप आणीत होते. त्या सर्वांनी दाढ्या कापलेल्या होत्या अंगावर जखमा केलेल्या होत्या त्यांचे कपडे फाटलेले होते, त्यांनी मुंडन केले होते.ते शखेम, शिलो व शोमरोन येथून आले होते. त्यातील कोणालाही गदल्याच्या वधाविषयी माहिती नव्हती.

Cross references

1 शमुवेल 27:11

पराभूतांपैकी कोणालाही त्याने गथला जिवंत येऊ दिले नाही. दावीदला वाटायचे, “त्यांच्यापैकी कोणी इथे आले तर प्रत्यक्षात काय आहे ते आखीशला कळायचे.” पलिष्ट्यांच्या भूमीत असेपर्यंत दावीदाने असेच केले.

स्तोत्रसंहिता 52:1

बलवान पुरुषा, तू तुझ्या दुष्कर्मांची बढाई का करीत आहेस? तू देवाला एक कलंक आहेस. तू दिवसभर वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतोस.

Interlinear

Choose Theme