ऐका! दान प्रांतातून दूताचा आवाज येत आहे. एफ्राईम ह्या टेकड्यांच्या देशातून हा माणूस वाईट बातमी आणीत आहे.
Cross references
यहोशवा त्यावर म्हणाला, “तुमची संख्या वाढली असेल तर मग त्या डोंगराळ प्रदेशात जा. सध्या ती जमीन परिज्जी व रेफाई यांच्या मालकीची आहे. पण एफ्राईमाचा डोंगराळ प्रदेश तुम्हाला अपुरा पडत असेल तर त्या जमिनीचा ताबा घ्या.”
तेव्हा “आश्रयस्थाने” म्हणून इस्राएल लोकांनी काही नगरांची निवड केली. ती नगरे अशी;नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील, गालील मधले केदेश, एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शखेम, यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातील किर्याथ-आर्बा (म्हणजेच हेब्रोन)
पूर्वीचे लईश हे नाव बदलून त्यांनी त्याला दान हे नाव दिले. इस्राएलाचा एक वंशज दान हा त्यांचा पूर्वज होता, त्याच्यावरुन हे नाव मिळाले.
तेव्हा इस्राएलमधील लोक मिस्पा येथे परमेश्वरासमोर गोळा झाले. गिलादमधील लोकांसह झाडून सर्व लोक हजर होते.
बन्यामीनच्या लोकांनो, जीव वाचविण्यासाठी पळा. यरुशलेमपासून दूर पळा. तकोवामध्ये तुतारी फुंका. बेथ-हक्करेमवर धोक्याचा इशारा देणारे निशाण उभारा. हे सर्व करा कारण उत्तरेकडून अरिष्ट येत आहे. भयानक नाश तुमच्याकडे येत आहे.
दानच्या कुळाच्या मालकीच्या भूमीवरुन येणाऱ्या शत्रूंच्या घोड्यांच्या फुरफुरण्याचा आवाज आम्ही ऐकतो. त्यांच्या खुरांच्या दणदणाटाने जमीन हादरते. ते ही भूमी व त्यावरील प्रत्येक गोष्टीचा नाश करण्यासाठी आले आहेत. ते नगराचा व त्यात राहणाऱ्या सर्व लोकांना नाश करण्यासाठी आले आहेत.