रिब्लामध्ये, सिद्कीयाच्या डोळ्यांदेखत, बाबेलच्या राजाने सिद्कीयाच्या मुलांना व वरिष्ठ अधिकाऱ्यांना मारले.
Cross references
आणि तेथून काही अंतर ती चालून गेली व थांबून तेथे बसली. आपला मुलगा पाण्यावाचून मरेल असे तिला वाटले; त्याचा मृत्यू आपल्याला पाहवणार नाही असे समजून ती तेथे दूर अंतरावर बसली, व हंबरडा फोडून रडू लागली.
आणि त्या धाकटया भावशिवाय माझ्या बापाकडे माघारी जाण्याची माझ्यात हिंमत नाही! माझ्या बापाचे काय होईल याची मला भयंकर भीती वाटते, हो स्वामी!”
जे दृष्टीस पडेल त्याने तुम्ही चक्रावून जाल.
ती तुझी तुझ्या पूर्वजांशी भेट करुन देईन. तुला मरण येईल आणि तू सुखाने कबरीत पडशील. यरुशलेमवर येणारे अरिष्ट तुला आपल्या डोळ्यांनी पाहावे लागणार नाही.”‘मग याजक हिल्कीया, अहीकाम, अखबोर, शाफान, असाया यांनी हा संदेश राजाला सांगितला.
त्यांनी सिद्कीयाच्या मुलांना त्याच्या नजरेसमोर जिवे मारले. नंतर सिद्कीयाचे डोळे काढले आणि त्याला जेरबंद करुन बाबेलला नेले.
तुझ्या पूर्वजांकडे मी तुला नेईन.तुला शांत मरण येईल. या प्रदेशावर आणि लोकांवर जी संकटे कोसळतील ती तुला पाहायला लागणार नाहीत.”‘ हिल्कीया आणि राजाचे सेवक या सर्वांनी हा निरोप राजाला येऊन सांगितला.
माझ्या लोकांवर ही भयंकर आपत्ती आलेली मला पाहवणार नाही. माझ्या लोकांची हत्या माझ्याने पाहवणार नाही.”
त्यांची घरे लुटली जातील. त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार होतील, त्यांच्या डोळ्यादेखत लहान मुलांना मरेपर्यंत मारले जाईल.
असे घडल्यावर,” हा परमेश्वराचा संदेश आहे, ‘मी यहूदाचा राजा सिद्कीया याला, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या स्वाधीन करीन. मी सिद्कीयाच्या अधिकाऱ्यानासुद्धा नबुखदनेस्सरच्या हवाली करीन. यरुशलेममधील काही लोक भयंकर रोगराई अथवा लढाई वा उपासमार याने मरणार नाहीत. पण त्या सर्वांना मी नबुखद्नेस्सरच्या ताब्यात देईन. मी यहूदाच्या शत्रूला विजयी करीन. नबुखद्नेस्सरच्या सैन्याला यहूदातील लोकांना ठार मारायचे आहे म्हणून यहूदातील व यरुशलेममधील लोक तलवरीच्या घावाने मारले जातील. नबुखद्नेस्सर त्या लोकांना अजिबात दया दाखविणार नाही व त्यांच्याबद्दल त्याला दु:खही वाटणार नाही.’
“पण यहूदाचा राजा सिद्कीया हा त्या अतिशय नासल्यामुळे खाण्यालायक न राहिलेल्या अंजिरासारखा असेल. सिद्कीया त्याचे उच्चपदस्थ अधिकारी, यरुशलेममध्ये उरलेले लोक व मिसरमध्ये राहत असलेले यहूदी हे सर्व त्या नासक्या अंजिरासारखे असतील.
माझ्यासमोर करार करुन, वासराच्या दोन तुकड्यांमधून चालत जाणारे हे लोक म्हणजे यहूदा आणि यरुशलेमचे नेते, न्यायालयातील महत्वाचे अधिकारी, याजक आणि या देशातील लोक होत.
मी ह्या सर्व लोकांना त्यांच्या शत्रूंच्या अथवा त्यांना मारु इच्छिणाऱ्या कोणाही व्यक्तीच्या हवाली करीन. त्यांची प्रेते म्हणजे पक्षी व वन्य पशूंचे भक्ष्य होतील.
रिब्लामध्येच बाबेलच्या राजाने सिद्कीयाच्या मुलांना मारले आणि सिद्कीयाला मुद्दाम ते पाहायला लावले. यहूदाच्या सर्व अधिकाऱ्यांनाही त्याने ठार केले.
ह्यासाठी कळपातील उत्तम जनावर निवडा. भांड्याखाली भरपूर लाकडे टाका आणि मांसाचे तुकडे शिजवा. हाडे शिजेपर्यंत रस्सा उकळवा.’
परमेश्वर म्हणाला, “परमेश्वराच्या यज्ञार्पण करण्याच्या दिवशी, मी राजाचे मुलगे व इतर नेते ह्यांना शिक्षा करीन. परदेशीय वस्त्रे घातलेल्यांना पण मी सजा देईन.