Home Bibles यिर्मया 39:10 · मराठी बायबल
यिर्मया 39:10 · मराठी बायबल

पण नबूजरदानने यहूदातील काही गरीब लोकांना सोडले. ह्या लोकांजवळ काहीही नव्हते म्हणून नबूजरदानने त्यांना द्राक्षमळे व जमीन दिली.

Cross references

2 राजे 25:12

अगदीच दरिद्री लोकांना तेवढे त्याने तेथेच राहू दिले. द्राक्षमळे आणि शेतीची देखभाल करण्यासाठी त्याने त्यांना तिथे ठेवले.

यिर्मया 40:7

यरुशलेमचा नाश झाला तेव्हा यहूदाच्या सैन्यातील काही सैनिक, अधिकारी आणि त्यांची काही माणसे रानात राहात होती. बाबेलच्या राजाने अहीकामचा मुलगा गदल्या ह्यास, मागे राहिलेल्या लोकांचा अधिपती म्हणून नेमले आहे, हे त्यांना कळले. अगदी गरीब स्त्री पुरुष व मुले ह्यांना कैद करुन बाबेलला नेले नव्हते हे लोक मागेच राहिले होते.

यिर्मया 52:16

पण नबूजरदानने काही अगदी गरीब लोकांना द्राक्षमळ्यांत व शेतांत काम करण्यासाठी मागेच ठेवले.

यहेज्केल 33:24

“मानवपुत्रा, इस्राएलच्या विद्ध्वंस झालेल्या गावांतून इस्राएली राहात आहेत. ते म्हणतात, ‘अब्राहाम एकटा असताना देवाने त्याला ही सर्व भूमी दिली. आता, आम्ही पुष्कळ आहोत आणि ही भूमी नक्कीच आमची आहे. ही आमच्या मालकीची आहे.’

Interlinear

Choose Theme