Home Bibles यिर्मया 38:10 · मराठी बायबल
यिर्मया 38:10 · मराठी बायबल

नंतर एबद-मलेख या कुशीला राजाने हूकूम दिला, “एबद-मलेख, राजवाड्यातून तीन माणसे तुझ्याबरोबर घे. जा आणि यिर्मया मरायच्या आधी त्याला पाण्याच्या टाकीतून बाहेर काढ.”

Cross references

एस्तेर 5:2

त्यामुळे राजाने एस्तेर राणी चौकात उभी राहिलेली पाहिली. तिला पाहून तो खुष झाला. आपल्या हातातला सोन्याचा राजदंड त्याने तिच्या दिशेने पुढे केला. तेव्हा राणी आत शिरली आणि राजाजवळ गेली. सुवर्णराजदंडाच्या दुसऱ्या टोकाला तिने स्पर्श केला.

एस्तेर 8:7

राजा अहश्वेरोशने राणी एस्तेर आणि मर्दखय यांना उत्तर दिले. राजा त्यांना म्हणाला, “हामान यहुद्यांविरुध्द होता म्हणून त्याची मालमत्ता मी एस्तेरला दिली. आणि माझ्या शिपायांनी त्याला वधस्तंभावर फाशी दिले आहे.

स्तोत्रसंहिता 75:10

मी दुष्टांकडून सत्ता काढून घेईन आणि मी चांगल्या लोकांकडे सत्ता देईन.

नीतिसूत्रे 21:1

शेतकरी शेताला पाणी देण्यासाठी खड्डे खणतात. पाण्याला दिशा देण्यासाठी ते वेगवेगळे खड्डे बुजवतात. त्याच रीतीने परमेश्वर राजाच्या मनावर ताबा मिळवतो. राजाने जिथे जावे असे परमेश्वराला वाटते तिथे परमेश्वर त्याला नेतो.

Interlinear

Choose Theme