मग यिर्मया सिद्कीया राजाला म्हणाला, “माझे काय चुकले! मी तुझ्याविरुद्ध अथवा तुझ्या अधिकाऱ्यांविरुद्ध वा यरुशलेमच्या लोकांविरुद्ध काय गुन्हा केला? मला तुरुंगात का टाकलेस?
Cross references
मग याकोबाला फार राग आला. तो म्हणाला, “मी काय वाईट केले आहे? मी कोणता करार मोडला आहे? माझा पाठलाग करण्याचा आणि मला थांबविण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे?
शौलला तो म्हणाला, “दावीद आपला घात करील असे लोक म्हणतात तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे का लक्ष देता?
तो पुढे म्हणाला, “धनी, तुम्ही माझा पाठलाग का करत आहात? मी काय केले? माझा अपराध कोणता?
जे लोक तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करतात त्यांच्यासाठी तुम्ही वाईट गोष्टी करु नका. तुम्ही जर तसे केलेत तर तुम्हाला आयुष्यभर संकटांना सामोर जावे लागेल.
काहीही चूक केली नसताना एखाद्याला शिक्षा करणे चूक आहे. जे नेते प्रामाणिक असतात त्यांना शिक्षा करणे चूक आहे.
“हिज्कीया यहूदाचा राजा होता. पण हिज्कीयाने मीखाला ठार मारले नाही. यहूदातील कोणीही मीखाला ठार मारले नाही. हिज्कीयाला परमेश्वराबद्दल आदर होता, हे तुम्हाला माहीतच आहे. त्याला परमेश्वराला प्रसन्न ठेवण्याची इच्छा होती. हिज्कीया यहूदाचे वाईट करील असे परमेश्वराने सांगितले होते. पण हिज्कीयाने परमेश्वराची करुणा भाकली आणि परमेश्वराचे हृदयपरिवर्तन झाले. परमेश्वराने त्या वाईट गोष्टी घडू दिल्या नाहीत. आपण जर यिर्मयाला इजा केली, तर आपण स्वत:वरच खूप संकटे ओढवून घेऊन ती आपलीच चूक ठरेल.”
माझ्या देवाने मला वाचविण्यासाठी, देवदूताला पाठविले देवदूताने सिंहाची तोंडे बंद केली. मी निरपराधी आहे,” हे माझ्या देवाला माहीत आहे म्हणूनच सिंहानी मला मारले नाही. राजा, मी तुझे कधीही काहीही वाईट केले नाही.
परंतु येशू त्यांना म्हणाला, “पित्यापासून आलेल्या कितीतरी चांगल्या गोष्टी मी केल्या. त्या गोष्टी तुम्ही पाहिल्या आहेत. त्यापैकी कोणत्या चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही मला जिवे मारीत आहात?”
पौल यहूदी धर्मसभेच्या सभासदांकडे रोखून पाहत म्हणाला, “माझ्या बंधूलो, मी आजपर्यंत चांगला विवेकभाव बाळगून देवासमोर माझे जीवन जगत आलो आहे.”
यासाठी देवापुढे आणि मनुष्यांपुढे आपला विवेक शुद्ध असावा याचा मी नेहमी आटोकाट प्रयत्न करीत असतो.
पौल आपला बचाव करण्यासाठी असे म्हणाला, “मी यहूदी लोकांच्या नियमशास्त्राच्या, मंदिराच्या किंवा कैसराच्या विरुद्ध काही गुन्हा केलेला नाही.”
मी जर काही गुन्हा केला असेल तर मला मरणदंड झाला पाहिजे. आणि त्यापासून सुटका व्हावी असा प्रयत्न मी करणार नाही. परंतु जे आरोप हे लोक माझ्यावर करीत आहेत, ते खरे नसतील तर मला कोणी यांच्या हाती देऊ शकणार नाही, मी आपले गाऱ्हाणे कैसरासमोर मांडू इच्छितो.”
परंतु याला मरणदंड द्यावा असे याने काहीही केले नाही, असे मला आढळून आले. आणि त्याने स्वत:च आपणांला सम्राटाकडून (कैसराकडून) न्याय मिळावा अशी मागणी केली, म्हणून मी त्याला कैसरासमोर न्यायासाठी पाठविण्याचे ठरविले आहे.
ते न्यायालयातून बाहेर पडल्यावर एकमेकांशी बोलत होते. ते म्हणाले, “ज्यामुळे तुरुंगवास किंवा मरणदंड द्यावा असे काहीही या मनुष्याने केले नाही.”
तुम्हांला खरे सांगितले म्हणून मी तुमचा वैरी झालो काय?