यिर्मया इरीयाला म्हणाला, “हे खरे नाही मी तुम्हाला सोडून खास्द्यांकडे जात नाही” पण यिर्मयाचे म्हणणे इरीयाने ऐकले नाही. त्यांनी यिर्मयाला अटक करुन यरुशलेमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नेले.
Cross references
तेव्हा मी सनबल्लटला उलट उत्तर पाठवले की, “तू म्हणतोस तसे काही चाललेले नाही. या केवळ तुझ्याच मनातल्या कल्पना आहेत.”
मला माझ्या शत्रुंचा बळी होऊ देऊ नको त्यांनी माझ्याबद्दल खोटेनाटे सांगितले. मला दुख देण्यासाठी त्यांनी माझ्याबद्दल खोटे सांगितले.
साक्षिदारांचा समूह मला दु:ख द्यायचे कारस्थान करीत आहे. ते लोक मला प्रश्न विचारतील आणि ते काय बोलतात ते मला कळत नाही.
बलवान पुरुषा, तू तुझ्या दुष्कर्मांची बढाई का करीत आहेस? तू देवाला एक कलंक आहेस. तू दिवसभर वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतोस.
यिर्मया, आता मी तुझी सुटका करीन. मी तुझ्या बेड्या काढतो तुझी इच्छा असल्यास तू माझ्याबरोबर बाबेलला ये. मी तुझी चांगली काळजी घेईन. पण, तुझी इच्छा नसल्यास, तू माझ्याबरोबर येऊ नको. सर्व देश तुझ्यापुढे मोकळा आहे तुला पाहिजे तेथे जा.
“जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा करतील, तुमचा छळ करतील व लबाडीने तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट बोलतील तेव्हा तुम्ही धन्य आहात.
“जेव्हा लोक तुमचा द्धेष करतील, तुम्हांला वाळीत टाकतील आणि तुमचा अपमान करतील, जेव्हा तुमचे नाव ते वाईट समजतील आणि मनुष्याच्या पुत्रामुळे तुम्हाला नाकारतील, तेव्हा तुम्ही आशीर्वादित व्हाल.
“जेव्हा सर्व तुमच्याविषयी चांगले बोलतील तेव्हा तुम्हांला दु:ख होवो कारण त्यांच्या वाडवडिलांनी खोट्या संदेष्ट्यांना असेच केले.
पण हे सौम्यतेने व आदराने करा. ख्रिस्तामध्ये जगत असताना तुमच्या चांगल्या वागणुकीवर जे आरोप करतात त्यांना लाज वाटेल, अशा रीतीने तुम्ही आपली विवेकबुद्धी शुद्ध राखा.
जर तुम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आहात म्हणून कोणी तुमचा अपमान केला तर तुम्ही धन्य आहात. कारण देवाचा गौरवी आत्मा तुयच्यावर विसावतो.