Home Bibles यिर्मया 35:13 · मराठी बायबल
यिर्मया 35:13 · मराठी बायबल

सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “यहूदातील व यरुशलेममधील लोकांना हा संदेश ऐकव. तुम्ही लोकांनी धडा शिकावा व माझ्या संदेशाचे पालन करावे.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.

Cross references

स्तोत्रसंहिता 32:8

परमेश्वर म्हणतो, “मी तुला आयुष्य कसे जगायचे याविषयी मार्गदर्शन करीन. मी तुझे रक्षण करीन आणि तुझा मार्गदर्शक होईन.

नीतिसूत्रे 8:10

माझ्या शिस्तीचा स्वीकार करा. ती रुप्यापेक्षाही मौल्यवान आहे. ती शुध्द सोन्यापेक्षाही मौल्यावान आहे.

नीतिसूत्रे 19:20

उपदेश ऐका आणि शिका. नंतर तुम्ही शहाणे व्हाल.

यशया 28:9

लोकांना धडा शिकविण्याचा परमेश्वर प्रयत्न करीत आहे. त्याची शिकवण लोकांच्या लक्षात यावी म्हणून तो प्रयत्नशील आहे. पण लोक परवा परवापर्यंत आईचे दूध पिणाऱ्या तान्ह्या मुलांप्रमाणे वागतात;

यशया 42:23

तुमच्यातील कोणी देवाचे म्हणणे ऐकले आहे का? नाही. पण तुम्ही ते लक्षपूर्वक ऐकावे व काय घडले आहे त्याचा विचार करावा.

यिर्मया 5:3

हे परमेश्वरा, मला माहीत आहे की तुझ्या लोकांनी तुझ्याशी एकनिष्ठपणे वागायला हवे आहे. तू यहूदातील लोकांना चोपलेस पण त्यांना काही वेदना झाल्या नाहीत. तू त्यांचा नाश केलास, पण त्यांनी धडा शिकण्यास नकार दिला. ते फार दुराग्रही झालेत. त्यांनी केलेल्या वाईट कृत्यांबद्दल त्यांना खेद वाटला नाही.

यिर्मया 6:8

यरुशलेम, धोक्याचा इशारा ऐक. जर तू ऐकले नाहीस तर मी तुझ्याकडे पाठ फिरवीन, तुझ्या भूमीचे ओसाड वाळवंट करीन. येथे कोणीही राहू शकणार नाही.”

यिर्मया 6:10

मी कोणाशी बोलू शकतो? मी कोणाला इशारा देऊ शकतो? माझे कोण ऐकेल? इस्राएलच्या लोकांनी आपले कान बंद करुन घेतले आहेत. म्हणून ते माझा इशारा ऐकू शकत नाहीत. लोकांना परमेश्वराची शिकवण आवडत नाही. त्यांना परमेश्वराचा संदेश ऐकावासा वाटत नाही.

यिर्मया 9:12

ह्या गोष्टी समजू शकण्याइतका सुज्ञ कोणी आहे का? परमेश्वराकडून शिकविला गेलेला कोणी आहे का? परमेश्वराच्या संदेशाचे स्पष्टीकरण कोणी करु शकेल का? ह्या भूमीचा नाश का झाला? जेथे कोणीही जात नाही अशा वाळवंटासारखी ती का केली गेली?

यिर्मया 25:2

यहूदा आणि यरुशलेम येथील लोकांना यिर्मयाने पुढील संदेश ऐकविला:

यिर्मया 32:33

“त्या लोकांनी मदतीसाठी माझ्याकडे यावे पण त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली. मी त्यांना शिकविण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पण त्यांनी माझे ऐकले नाही. मी त्यांना नीती शिकवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी लक्ष दिले नाही.

इब्री लोकांस 12:25

जो बोलतो त्याचे ऐकण्यासाठी नकार देऊ नका. त्याविषयी खात्री असू द्या. ज्याने पृथ्वीवर त्यांना सावध राहण्याविषयी सांगताना त्याचे ऐकायचे नाही असे ज्यांनी ठरविले ते लोक जर सुटू शकले नाहीत तर मग जो स्वर्गातून सावध करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर आम्हाला सुटकेसाठी कोणता मार्ग राहीला बरे?

Interlinear

Choose Theme