Home Bibles यिर्मया 33:20 · मराठी बायबल
यिर्मया 33:20 · मराठी बायबल

परमेश्वर म्हणतो, “दिवस आणि रात्र यांच्याबरोबर मी करार केला आहे. ते निरंतर राहतील असे मी मान्य केले, तुम्ही तो करार बदलू शकत नाही. दिवस आणि रात्र नेहमी योग्य वेळेलाच येतील. तुम्ही जर हा करार बदलू शकला,

Cross references

उत्पत्ति 8:22

जोपर्यंत पृथ्वी राहील तो पर्यंत पेरणी व कापणी, थंडी व ऊन, हिवाळा व उन्हाळा, दिवस व रात्र व्हावयाची थांबणार नाहींत.”

स्तोत्रसंहिता 89:37

ते चंद्राप्रमाणे सदैव राहील. आकाश या कराराचा पुरावा आहे त्या करारावर तुम्ही विश्वास ठेवू शकता.”

स्तोत्रसंहिता 104:19

देवा, तू आम्हाला सण केव्हा येतो ते कळण्यासाठी चंद्र दिलास आणि सूर्याला केव्हा मावळायचे ते नेहमीच कळते.

यशया 54:9

देव म्हणतो, “नोहाच्या काळात प्रलय आणून मी जगाला शिक्षा केली होती ते आठव. पण, पुन्हा प्रलय घडवून जग नष्ट करणार नाही असे वचन मी नोहाला दिले होते. त्याचप्रमाणे मी आता तुला वचन देतो की मी तुझ्यावर कधी रागावणार नाही आणि तुझी खरडपट्टी ही काढणार नाही.”

यशया 66:22

“मी नवे जग निर्माण करीन आणि नवा स्वर्ग व नवी पृथ्वी अक्षय राहतील. त्याचप्रमाणे तुमची नावे आणि मुले नेहमी माझ्याबरोबर असतील.

यिर्मया 31:35

परमेश्वर म्हणतो, “परमेश्वर दिवसा सूर्याला प्रकाशित करतो आणि रात्री चंद्र व तारे यांना प्रकाशित करतो. परमेश्वर समुद्र घुसळतो म्हणून समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळतात. सर्वशक्तिमान परमेश्वर असे त्याला म्हणतात.”

यिर्मया 33:25

परमेश्वर म्हणतो, “माझा दिवस व रात्र यांच्याबरोबरच्या कराराचा जर भंग झाला आणि मी जर आकाश आणि पृथ्वी ह्यांच्यासाठी नियम केले नसते, तर कदाचित् मी त्या लोकांना सोडले असते.

Interlinear

Choose Theme