Home Bibles ☰ Books यिर्मया 32:9 · मराठी बायबल
यिर्मया 32:9 · मराठी बायबल

म्हणून मी माझा चुलतभाऊ हानामेल याच्याकडून ते शेत विकत घेतले. त्याबद्दल मी त्याला 17 चांदीची नाणीदिली.

Cross references

उत्पत्ति 23:15

“माझे स्वामी, माझे जरा ऐका; जमिनीची किंमत 10 पौंडचांदी आहे ही किंमत तुम्हाला व मला म्हणजे काय मोठे? तेव्हा त्यापेक्षा सरळ माझे शेत ताब्यात घ्या व तेथे तुमच्या बायकोला मूठमाती द्या.”

उत्पत्ति 23:16

अब्राहामाने ही किंमतच असल्याचे समजून घेतले व त्याने एफ्रोनला त्यांच्या पद्धतीप्रमाणे चांदीची दहा नाणी (म्हणजे चारशे शेकेल भार रुप्याची नाणी) तोलून दिली.

उत्पत्ति 37:28

ते मिद्यानी व्यापारी जवळ आल्यावर त्या भावांनी योसेफाला खाड्यातून बाहेर काढले व त्या इश्माएली व्यापाऱ्यांस वीस चांदीची नाणी घेऊन विकून टाकले. ते व्यापारी योसेफास मिसर देशास घेऊन गेले.

1 राजे 20:39

राजा तिथून जात होता. तेव्हा संदेष्टा त्याला म्हणाला, “मी लढाईवर गेलो होतो. आपल्यापैकी एकाने एका शत्रू सैनिकाला माझ्यापुढे आणले आणि मला सांगितले, “याच्यावर नजर ठेव. हा पळाला तर याच्या जागी तुला आपला जीव द्यावा लागेल किंवा पंचाहत्तर पौंड चांदीचा दंड भरावा लागेल.

एस्तेर 3:9

“राजाची मर्जी असल्यास एक सूचना करतो: या लोकांचा संहार करण्याची आज्ञा द्यावी. 10000 रौप्यमुद्रा मी राजाच्या खजिन्यातजमा करीन या पैशाचा विनियोग ही गोष्ट अंमलात आणणाऱ्या लोकांना मोबदला देण्यासाठी करता येईल.”

यशया 55:2

जे खरोखरचे ‘अन्न’ नाही त्यासाठी पैसे वाया का घालविता? तुम्हाला ज्यापासून समाधान मिळत नाही असे काम तुम्ही का करता? माझे लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला चांगले अन्न मिळेल. तुमच्या जीवाला तृप्ती देणाऱ्या अन्नाचा आनंद तुम्हाला मिळेल.

होशेय 3:2

म्हणून मी सहा औस चांदी व 9 बुशेल जव देऊन गोमरला विकत घेतले.

जखऱ्या 11:12

मग मी म्हणालो, “तुमची इच्छा असल्यास माझा पगार द्या. इच्छा नसल्यास देऊ नका.” तेव्हा त्यांनी मला तीस चांदीची नाणी दिली.

Interlinear

Choose Theme