Home Bibles यिर्मया 32:31 · मराठी बायबल
यिर्मया 32:31 · मराठी बायबल

“यरुशलेमच्या उभारणीपासून आतापर्यंत ह्या नगरीतल्या लोकांनी मला संतापविले आहे. त्यांनी मला इतके संतापविले की मला ती नगरी नजरे पुढून नाहीशी केलीच पाहिजे.

Cross references

1 राजे 11:7

कमोश या मवाबी लोकांच्या भंयकर दैवताच्या पूजेसाठी शलमोनाने एक पूजास्थळ बांधले. हे यरुशलेम नजीकच्या टेकडीवर होते. त्याच टेकडीवर मोलख या अम्मोनी लोकांच्या भयंकर दैवतासाठीही एक स्थळ केले.

2 राजे 21:4

परमेश्वराच्या मंदिरात त्याने इतर देवतांच्या पूजेसाठी वेद्याग बांधल्या. (आपल्या नावाप्रीत्यर्थ परमेश्वराने हे मंदिर केले होते.)

2 राजे 21:16

शिवाय मनश्शेने अनेक निरपराध्यांची हत्या केली. संपूर्ण यरुशलेम त्याने रक्तलांछित केले. यहूद्यांना त्याने जी पापे करायला लावली ती वेगळीच. परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते मनश्शेने यहूदाला करायला लावले.”‘

2 राजे 22:16

“परमेश्वराचे म्हणणे आहे की, हा प्रदेश आणि तेथे राहणारे लोक यांच्यावर आता मी अरिष्ट आणणार आहे. यहूदाच्या राजाने त्या पुस्तकात वाचली तीच संकटे येतील.

2 राजे 23:15

नबाटचा मुलगा यराबाम याने बांधलेली बेथेलमधली वेदी आणि उच्चस्थानेही योशीयाने उध्वस्त केली. या यराबामने इस्राएलला पाप करायला लावले होते. योशीयाने त्या बांधकामांची मोडतोड करुन त्याची अगदी माती केली. अशेरा स्तंभही त्याने जाळून टाकला.

2 राजे 23:27

परमेश्वर म्हणाला, “मी इस्राएलांना हुसकावून लावले तसेच यहूदांना करीन त्यांना मी नजरेपुढून घालवीन. यरुशलेमचाही मी त्याग करीन. मीच ते नगर निवडले हे खरे पण तेथील मंदिराची मी मोडतोड करीन “माझे नाव राखणारी जागा” असे याच स्थळाबद्दल मी म्हणत होतो.”

2 राजे 24:3

यहूदा आपल्या नजरेसमोरुन नाहीसे व्हावा म्हणून परमेश्वराच्या आज्ञेने हे झाले. मनश्शेची पापे याला कारणीभूत होती.

यिर्मया 5:9

ह्या कर्मांबद्दल मी यहूदातील लोकांना शिक्षा करावी का?” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “हो! अशा रीतीने जीवन जगणाऱ्या राष्ट्राला मी शिक्षा करीनच, हे तू जाणतेस. त्यांच्या लायकीप्रमाणे मी त्यांना शिक्षा करीन.

यिर्मया 6:6

सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो, “यरुशलेमच्या भोवतालची झाडे कापा आणि तिच्याविरुद्ध मोर्चा बांधा. ह्या नगरीला शिक्षा व्हावीच ह्या नगरीच्या आत जुलुमाशिवाय काहीही नाही.

यिर्मया 23:14

आता मी यहूदाच्या संदेष्ट्यांना यरुशलेममध्ये भयंकर गोष्टी करताना पाहिले आहे. ते व्यभिचाराचे पाप करतात. ते खोट्या गोष्टी एकतात आणि खोट्या शिकवणुकीचे पालन करतात. ते दुष्टांना दुष्कृत्ये करायला प्रोत्साहन देतात. म्हणून लोक पाप करीतच राहतात. ते सदोममधील माणसाप्रमाणे आहेत. यरुशलेम आता मला गमोऱ्यासारखे वाटते.”

यिर्मया 23:39

पण तुम्ही माझ्या संदेशाला ‘भारी बोजाच’ म्हणालात. म्हणून मी तुम्हाला. मोठ्या ओझ्याप्रमाणे वर उचलून माझ्यापासून लांब फेकून देईन. मी तुमच्या पूर्वजांना यरुशलेम नगरी दिली. पण मी तुम्हाला आणि त्या नगरीला माझ्यापासून दूर फेकीन.

यिर्मया 27:10

पण ते खोटे बोलत आहेत. तुमच्या जन्मभूमीपासून तुम्हाला दूर नेण्यास ते कारणीभूत होतील. मी तुम्हाला तुमची घरे सोडायला भाग पाडीन. तुम्ही दुसऱ्या देशात मराल.

विलापगीत 1:8

यरुशलेमने फार पाप केले. तिच्या पापांमुळेच ती भग्नावशेष उरली. लोकांनी पाहून चुकचुकावे असेच ते रूप होय. पूर्वी लोकांनी तिचा आदर केला. पण आता तेच तिचा तिरस्कार करतात. त्यानी तिची निर्भर्त्सना केली म्हमून ते आता तिची घृणा करतात. यरुशलेम आता कण्हत आहे. ती तोंड फिरविते.

यहेज्केल 22:2

“मानवपुत्रा, तू न्याय करशील का? खुन्यांच्या नगरीचा यरुशलेमचा तू न्यायनिवाडा करशील का? तिने केलेल्या भयंकर गोष्टीबद्दल तू तिला सांगशील का?

मत्तय 23:37

अगे, यरूशलेमे, यरूशलेमे, तू संदेष्ट्यांना जिवे मारतेस. देवाने तुझ्याकडे पाठविलेल्या लोकांना दगडमार करतेस. कोंबडी जशी आपल्या पिल्लांना पंखाखाली एकवटते तसे तुझ्यातील लोकांना एकवटण्याचा पुष्कळ वेळा मी प्रयत्न केला पण तू मला तसे करू दिले नाहीस.

लूक 13:33

तरीही आज, उद्या आणि परवा मला पुढे गेले पाहिजे कारण संदेष्टयांने यरुशलेमाबाहेर मरणे ह्याचा विचार करणे चूक आहे.

Interlinear

Choose Theme