Home Bibles यिर्मया 31:15 · मराठी बायबल
यिर्मया 31:15 · मराठी बायबल

परमेश्वर म्हणतो, “रामामधून आवाज ऐकू येईल. तो भयंकर आकांत असेल खूप शोक असेल. राहेल आपल्या मुलांसाठी रडेल तिची मुले मेल्यामुळे ती कोणाकडूनही सांत्वन करुन घेणार नाही.”

Cross references

उत्पत्ति 5:24

एके दिवशी हनोख देवाबरोबर चालत होता; नंतर तो नाहिसा झाला कारण देवाने त्याला नेले.

उत्पत्ति 35:19

एक्राथ (म्हणजे बेथलहेम) गांवाला जाणाऱ्या वाटेजवळ राहेलीस पुरले

उत्पत्ति 37:35

याकोबाच्या सर्व मुलांनी व मुलीनीं त्याचे सांत्वन करण्यास खूप प्रयत्न केला खरा परंतु तो कधीही समाधान पावला नाही; तो म्हणाला, “मी मरेपर्यंत माझ्या मुलासाठी शोक करीत राहीन व अधोलोकात माझ्या मुलाकडे जाईन.” असा त्याच्या बापाने योसेफाकरिता अतिशय शोक केला.

उत्पत्ति 42:13

परंतु ते भाऊ म्हणाले, “नाही नाही महाराज! आम्ही सर्व भाऊच आहोत. आमच्या कुटुंबातील आम्ही एका बापाचे बारा मुलगे आहोत. आमचा सर्वात धाकटा भाऊ घरी बापाजवळ आहे. आणि आमचा दुसरा एक भाऊ फार पूर्वी मरण पावला. कनान देशातले आम्ही सर्व आपल्या दासासमान आहोत.”

उत्पत्ति 42:36

याकोब त्यांना म्हणाला, “मी माझ्या सर्व मुलांना मुकावे अशी तुमची इच्छा आहे काय? योसेफ गेला; शिमोनही गेला; आणि आता बन्यामीनालाही माझ्यापासून घेऊन जाण्याची तुमची इच्छा आहे!”

यहोशवा 18:25

गिबोन, रामा, बैरोथ.

1 शमुवेल 7:17

पण रामा येथे त्याचे घर असल्यामुळे तेथे त्याचे वारंवार जाणे होई. तेथूनच तो सर्व कारभार पाही. रामा येथे त्याने परमेश्वरासाठी वेदी बांधली.

ईयोब 7:21

तू मला माझ्या पापाबद्दल क्षमा का करुन टाकीत नाहीस? मी लवकरच मरेन आणि माझ्या थडग्यात जाईन. तू नंतर माझा शोध घेशील पण मी गेलेला असेन.”

स्तोत्रसंहिता 37:36

परंतु नंतर तो नाहीसा झाला, मी त्याला शोधले पण तो मला सापडला नाही.

स्तोत्रसंहिता 77:2

माझ्या प्रभु, मी संकटात असतो तेव्हा तुझ्याकडे येतो. मी रात्रभर तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. माझ्या आत्म्याने शांत व्हायला नकार दिला.

यशया 22:4

म्हणून मी म्हणतो, “माझ्याकडे बघू नका, मला रडू द्या. माझ्या लोकांच्या नाशाबद्दल माझे सांत्वन करू नका.”

यिर्मया 10:20

माझ्या तंबूचा नाश झाला. तंबूचे सर्व दोर तुटले आहेत. माझी मुले मला सोडून निघून गेली आहेत. माझा तंबू उभारायला एकही माणूस उरला नाही. माझा निवारा बांधायला एकही माणूस शिल्लक नाही.

यिर्मया 40:1

यिर्मयाची रामा येथे, सुटका झाल्यावर परमेश्वराकडून संदेश आला. बाबेलच्या राजाच्या खास सैनिकांचा प्रमुख नबूजरदान ह्याला रामा शहरात यिर्मया सापडला. यिर्मयाला बेड्या घातल्या होत्या. यरुशलेम व यहूदा येथील सर्व कैद्यांबरोबरच तो होता. त्या सर्वांना कैद करुन बाबेलला नेले होते.

विलापगीत 5:7

आमच्या पूर्वजांनी तुझ्याविरुध्द पाप केले. आता ते नाहीत. पण त्यांच्या पापाची फळे आता आम्ही भोगत आहोत.

यहेज्केल 2:10

मी तो पट उलगडला. त्यावर पुढे व मागे, अनेक प्रकारची शोकगीते, शोककथा व इशारे लिहिलेले होते.

मत्तय 2:16

तेव्हा ज्ञानी लोकांनी आपल्याला फसविले, हे पाहून हेरोद अतिशय रागावाला. त्याने ज्ञानी लोकांकडून त्या बालकाच्या जन्माची वेळ नीट समजून घेतली होती. त्यानुसार बालक जन्मल्याला आता दोन वर्षे उलटली होती. म्हणून त्याने माणसे पाठवून बेथलहेम व त्याच्या आसपासच्या प्रदेशातील दोन वर्षाच्या व त्याहून कमी वयाच्या मुलांची कत्तल करण्याची आज्ञा केली.

Interlinear

Choose Theme