Home Bibles यिर्मया 27:16 · मराठी बायबल
यिर्मया 27:16 · मराठी बायबल

नंतर मी (यिर्मया) याजकांना व सर्व लोकांना म्हणालो, “परमेश्वर म्हणतो ते खोटे संदेष्टे म्हणतात ‘खास्द्यांनी परमेश्वराच्या मंदिरातून खूप गोष्टी घेतल्या आहेत. त्या सर्व लवकरच परत आणल्या जातील. ते संदेष्टे खोटे सांगतात.’ म्हणून त्यांचे ऐकू नका.

Cross references

2 राजे 24:13

यरुशलेमच्या परमेश्वराच्या मंदिरातली आणि राजवाड्यातली सर्व मौल्यवान चीजवस्तू नबुखद्नेस्सरने हस्तगत केली. राजा शलमोनने परमेश्वराच्या मंदिरात ठेवलेली सर्व सुवर्णपात्रे त्याने मोडून तोडून टाकली. हे परमेश्वराच्या भाकिताप्रमाणेच झाले.

2 इतिहास 36:7

नबुखद्नेस्सरने परमेश्वराच्या मंदिरातील काही वस्तू हस्तगत करुन त्या बाबेलला नेल्या आणि स्वत:च्या घरात ठेवल्या.

यशया 9:15

(इस्राएलचे डोके म्हणजे तेथील वडीलधारी मंडळी व प्रतिष्ठित नेते आणि शेपूट म्हणजे असत्य कथन करणारे तोतये संदेष्टे.)

यिर्मया 27:10

पण ते खोटे बोलत आहेत. तुमच्या जन्मभूमीपासून तुम्हाला दूर नेण्यास ते कारणीभूत होतील. मी तुम्हाला तुमची घरे सोडायला भाग पाडीन. तुम्ही दुसऱ्या देशात मराल.

यिर्मया 27:14

पण खोटे संदेष्टे सांगतात की तुम्हाला कधीच बाबेलचे गुलाम व्हावे लागणार नाही.“त्यांचे मुळीचे ऐकू नका. कारण ते तुम्हाला खोटा उपदेश करतात.

यिर्मया 28:3

दोन वर्षांच्या आत, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने परमेश्वराच्या मंदिरातून नेलेल्या वस्तू मी परत आणीन. नबुखद्नेस्सरने त्या वस्तू बाबेलमध्ये नेल्या आहेत. पण मी त्या यरुशलेमला परत आणीन.

दानीएल 1:2

परमेशवरानेच नबुखद्नेस्सराच्याकरवी यहूदाचा राजा यहोयाकीम याचा पराभव केला. नबुखद्नेस्सरने देवाच्या मंदिरातील ताटल्या व इतर वस्तू नेल्या आणि बाबेलमधील त्याच्या मूर्तीच्या देवळात ठेवल्या.

Interlinear

Choose Theme