मेंढपाळांना लपायला कोठेही जागा राहणार नाही. ते नेते पळून जाऊ शकणार नाहीत.
Cross references
वाईट लोकही मदतीची अपेक्षा करतील. परंतु त्यांची संकटापासून सुटका नाही त्यांची आशा त्यांना मृत्यूकडे नेईल.”
परमेश्वराने एक दिवस निश्चित केला आहे. त्या दिवशी परमेश्वर गर्विष्ठ व फुशारक्या मारणाऱ्या लोकांना शिक्षा करील. मग त्या लोकांचे महत्व कमी होईल.
त्या वेळी, परमेश्वर, स्वर्गातील सैन्यांचा स्वर्गात व पृथ्वीवरील राजांचा पृथ्वीवर, न्यायानिवाडा करील.
सिद्कीया, तू बाबेलच्या राजाच्या तावडीतून सुटणार नाहीस. तुला पकडून निश्र्चितपणे त्याच्या ताब्यात दिले जाईल. तू बाबेलच्या राजाला प्रत्यक्ष पाहशील. तुम्ही समोरासमोर येऊन एकमेकांशी बोलाल व तू बाबेलला जाशील.
मग सिद्कीया राजाने यिर्मयाला बोलाविणे पाठविले आणि त्याला राजावाड्यात आणले. सिद्कीया एकांतात यिर्मयाशी बोलला. त्याने यिर्मयाला विचारले, “परमेश्वराकडून काही संदेश आला आहे का?”यिर्मयाने उत्तर दिले, “हो! परमेश्वराकडून संदेश आला आहे. सिद्कीया, तुला बाबेलच्या राजाच्या स्वाधीन केले जाईल.”
पण तू शरण जाण्यास नकार दिलास, तर यरुशलेम खास्द्यांच्या सैन्याच्या ताब्यात दिली जाईल. ते यरुशलेम जाळून भस्मसात करतील आणि तू त्यांच्या तावडीतून सुटणार नाहीस.”
“तुमच्या बायका मुलांना बाहेर काढले जाईल. त्यांना बाबेलच्या सैन्याच्या स्वाधीन केले जाईल. तू स्वत:ही त्या सैन्याच्या तावडीतून सुटणार नाहीस. तुला बाबेलचा राजा पकडेल आणि यरुशलेम जाळले जाईल.”
लोक घाबरुन पळतील ते गर्तेत पडतील एखादा त्यातून वर आलाच, तर तो सापळ्यात सापडेल मी मवाबवर शिक्षेचे वर्ष आणीन.” परमेश्वराने असे सांगितले.
पण बाबेलच्या सैन्याने सिद्कीया राजाचा पाठलाग केला. त्यांनी सिद्कीयास यरीहोच्या मैदानात गाठले. सिद्कीयाचे सर्व सैनिक पळून गेले.
राजाच्या खास रक्षकांच्या प्रमुखाने सराया व सफन्या यांना कैद करुन नेले. सराया महायाजक होता, तर सफन्या दुय्यम महायाजक होता. तीन द्वारपालांनाही कैदी म्हणून नेले
पण शेवटी कसेही करुन ह्या नव्या राजाने नबुखद्नेस्सराविरुद्ध बंड करण्याचा प्रयत्न केलाच. त्याने आपले दूत पाठवून मिसरकडे मदत मागितली त्यांना पुष्कळ घोडे व सैनिक मागितले. यहूदाचा नवा राजा ह्यात यशस्वी होईल, असे तुम्हाला वाटते का? नव्या राजाकडे करार मोडून शिक्षेतून सुटका करुन घेण्याइतके सामर्थ्य आहे, असे तुम्हाला वाटते का?”
पण यहूदाच्या राजाला पळून जाता येणार नाही. का? कारण त्याने कराराकडे दुर्लक्ष केले. नबुखद्नेस्सरला दिलेले वचन त्याने मोडले.”
कोणीही पळून जाऊ शकणार नाही. अगदी जोरात धावणारा सुध्दा! बलवान पुरेसे बलवान राहणार नाहीत. सैनिक पळून जाऊन स्वत:ला वाचवू शकणार नाहीत.
मी प्रभूला वेदीजवळ उभे असल्याचे पाहिले तो म्हणाला, “खांबांच्या माथ्यावर मार मग इमारत अगदी उंबऱ्यापासून हादरेल. खांब लोकांच्या डोक्यावर पाड. कोणी जिवंत राहिल्यास, मी त्याला तलवारीने ठार मारीन. एखादा पळून जाईल, पण सुटणार नाही. लोकांपैकी एकही सुटून पळू शकणार नाही.
जसे गुंडाळी गुंडाळतात तसे, आकाश गुंडाळले गेले, आणि प्रत्येक पर्वत वबेट त्याच्या स्थानावरुन हलविले गेले.
मग मी ते श्र्वापद आणि पृथ्वीवरील राजे आपापले सैन्य घेऊन जमा झालेले पाहिले. घोडेस्वारबरोबर व त्याच्यासैन्याबरोबर लढाई करण्यासाठी ते जमा झाले होते.