मी राजवाड्याचा नाश करण्यास माणसे पाठवीन. त्या प्रत्येकाच्या हातात शस्त्र असेल. त्यांचा उपयोग ते राजवाडा नष्ट करण्यासाठी करतील. ही माणसे, गंधसरुपासून बनविलेल्या भक्कम व सुंदर तुळया कापून जाळून टाकतील.
Cross references
कायदे करणाऱ्यांनो, तुम्हाला तुमच्या कृत्याचा जाब द्यावा लागेल, तेव्हा तुम्ही काय सांगाल? दूरच्या देशातून तुमचा विध्वंस येत आहे. तेव्हा मदतीसाठी कोठे धावाल? तुमची धनसंपत्ती तेव्हा उपयोगी पडणार नाही.
लक्ष द्या. आपला प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर, प्रचंड वृक्ष (अश्शूर) कापून टाकील. आपल्या सामर्थ्याच्या बळावर देव हे करील. श्रेष्ठ व प्रतिष्ठित लोकांचे महत्व तो कमी करील.
देव पुढे म्हणाला, “मी त्या लोकांना इतरांपासून वेगळे केले आहे. मी स्वत: त्याच्यावर सत्ता गाजवीन. मी रागावलो आहे. मी माझ्या योध्द्यांना त्या लोकांना शिक्षा करण्यासाठी, गोळा केले आहे. मला ह्या सुखी लोकांचा अभिमान वाटतो.
त्या वेळेला तटबंदी असलेले शहर वाळवंटाप्रमाणे ओसाड होईल. सर्व लोक दूर पळून गेलेले असतील. ते शहर चरायचे कुरण होईल. तेथे वासरे चरतील. गुरे वेलींची पाने खातील.
परमेश्वर, माझ्या प्रभुविरूध्द बोलण्यासाठी तू तुझ्या नोकरांचा उपयोग केलास. तू म्हणालास, “मी फार सामर्थ्यवान आहे माझ्याजवळ पुष्कळ रथ आहेत माझ्या बळावर मी लबानोनला हरविले. मी तेथील उंच डोंगरावर चढलो. मी तेथील सर्व उंच झाडे (सैन्ये) तोडली, मी तेथील उंच डोंगरावर व घनदाट जंगलात जाऊन आलो.
“बघ! मी लोहार निर्मिला. तो विस्तव फुलावा म्हणून हवा फुंकतो. मग तापलेल्या लोखंडापासून त्याला पाहिजे तसे हत्यार तो बनवितो. त्याचप्रमाणे मी ‘नाश’ करणारा घडविला आहे.
खुणेचे ध्वज सियोनच्या दिशेने दाखवा. जीव वाचविण्यासाठी पळा. वाट पाहू नका. कारण मी उत्तरेकडून अरिष्ट आणीत आहे. मी भयानक विध्वंस घडवून आणीत आहे.”
इस्राएलच्या वारसांनो हा परमेश्वराचा संदेश आहे. “दूरवरच्या राष्ट्राला मी, तुमच्यावर हल्ला करण्यासाठी लवकरच आणीन. ते शक्तिशाली राष्ट्र आहे. ते प्राचीन राष्ट्र आहे. त्या राष्ट्रांतील लोक तुम्हाला माहीत नसणारी भाषा बोलतात. ते काय बोलतात ते तुम्ही समजू शकणार नाही.
“तुम्हाला योग्य अशी शिक्षा मिळेल. तुमच्या रानास मी आग लावेन ती आग तुमच्याभोवतीचे सर्व काही जाळून टाकील.”‘
परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी, लोक, इस्राएलचे अपराध शोधण्याचे कसून प्रयत्न करतील. पण अपराध असणारच नाही. लोक यहूदाची पापे शोधण्याचे प्रयत्न करतील. पण त्यांना एकही पाप सापडणार नाही. का? कारण मी इस्राएलमधील व यहूदातील काही वाचलेल्या लोकांचे रक्षण करीन आणि त्यांनी पाप केले असले तरी त्यांना क्षमा करीन.”
मग देव नगरीला शिक्षा करणाऱ्या लोकांच्या नेत्यांशी मोठ्याने बोलला. प्रत्येक नेत्याच्या हातात स्वत:ची विध्वंसक शस्त्रे होती.
लबानोन, तू आपली दारे उघड म्हणजे अग्नी आत शिरुन तुझे गंधसरु जाळून टाकील.
राजा फार रागावला. त्याने त्याचे सैन्य पाठविले आणि त्यांनी त्या खुन्यांना ठार मारले. त्यांनी त्यांचे शहर जाळले.