तुझी व तुझ्या आईची जन्मभूमी नसलेल्या देशात, मी, तुला व तुझ्या आईला फेकून देईन. तेथेच तुम्ही दोघे मराल.
Cross references
यहोयाखीन राजा झाला तेव्हा तो अठरा वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर तीन महिने राज्य केले. याच्या आईचे नाव नेहूष्टा. ती यरुशलेमच्या एलनाथानची मुलगी.
यहोयाखीनला नबुखद्नेस्सरने बाबेलला कैदी म्हणून नेले. राजाची आई, बायका, सेवक, आणि गावातील प्रतिष्ठित लोक यांनाही त्याने नेले. हे सर्व त्याचे कैदी होते.
पुढे अबील मरोदख हा बाबेलचा राजा झाला. त्याने यहूदाचा राजा यहोयाखीन याची कैदेतून सुटका केली. यहोयाखीनला तोपर्यत तुरुंगात पडून सदतीस वर्षे झाली होती. अबील मरोदखने सत्तेवर आल्यावर बाराव्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी हे सुटकेचे काम केले.
अबील मरोदखने त्याला तुरुंगातले कपडे बदलायला लावले. पुढे आयुष्यभर यहोयाखीन अबील मरोदखच्या शेजारी मेजावर बसून जेवत असे.
अबील मरोदखने त्याला पुढे त्याच्या आयुष्यभर रोज जेवण दिले.
यहोखदीन यहूदाचा राजा झाला तेव्हा अठरा वर्षांचा होता.यरुशलेममध्ये त्याची कारकिर्द तीन महिने आणि दहा दिवस होती.परमेश्वराला अमान्य असलेले वर्तन करुन त्याने पाप केले.
“हे माणसा, परमेश्वर तुला चिरडून टाकील. परमेश्वर तुझा लहानसा चेंडू करून तुला दुसऱ्या मोठ्या देशात भिरकावून देईल. तेथेच तू मरशील.”परमेश्वर म्हणाला, “तुला तुझ्या रथांचा फार गर्व आहे पण त्या दूरदेशातील तुझ्या नवीन राजाचे रथ तुझ्यापेक्षा चांगले असतील. त्याच्या राजवाड्यात तुझे रथ शोभणार नाहीत.
ते लोक कदाचित् तुला विचारतील, ‘आम्ही कोठे जाऊ?’ तेव्हा तू त्यांना माझा पुढील संदेश दे परमेश्वर म्हणतो,‘काही लोकांना मी मरणासाठी निवडले आहे, ते मरतीलच. काही लोकांची निवड मी लढाईत मरण्यासाठी केली आहे, त्यांना तसेच मरण येईल. काहीना मी उपासमारीने मरण्यासाठी निवडले आहे; ते अन्नावाचून मरतील. काहीची निवड मी देशोधडीला लावण्यासाठीच केली आहे; त्यांना परदेशात कैदी म्हणून पाठविले जाईल.’
त्यांनी त्याला वेसण घालून पिंजऱ्यात कोंडले. त्यांनी त्या सिंहाला सापळ्यात अडकविले. मग त्यांनी त्याला बाबेलच्या राजाकडे नेले. आता, इस्राएलच्या डोंगरातून त्याची गर्जना तुम्हाला ऐकू येऊ शकत नाही.