का? कारण त्या माणसाने, मी आईच्या पोटात असतानाच, मला मारले नाही. त्याने मला मारले असते, तर आईच माझी कबर झाली असती व माझा जन्मच झाला नसता.
Cross references
का? कारण त्या रात्रीने माझ्या जन्माला अटकाव केला नाही. ही संकटे बघण्यापासून तिने मला परावृत केले नाही.
मी जन्माला आलो तेव्हाच का मरुन गेलो नाही? मी जन्मत:च का मेलो नाही?
मी जन्मत:च मेलेले आणि जमिनीत पुरले गेलेले मूल का झालो नाही? दिवसाच्या प्रकाशाचा किरणही न पाहिलेले मूल मी असतो तर बरे झाले असते.
म्हणून देवा, तू मला जन्माला तरी का घातलेस? मी कुणाच्या दृष्टीस पडण्याआधीच मेलो असतो तर बरे झाले असते.
एखादा माणूस खूप वर्षे जगेल आणि कदाचित त्याला 100 मुले असतील. परंतु जर तो माणूस चांगल्या गोष्टीत समाधानी नसला आणि तो मेल्यावर त्याची कोणाला आठवणही आली नाही तर जन्मत:च मेलेल्या मूल त्या माणसापेक्षा खूप बरे आहे असे मला वाटते.
माते, तू मला (यिर्मयाला) जन्म दिलास याचा मला खेद वाटतो. वाईट गोष्टीबद्दल सर्व देशावर दोषारोप व टीका करणे माझ्यासारख्याला भाग पडते. काहीही देणे घेणे नसताना, मला प्रत्येकजण शिव्याशाप देतो.