“यहूदा, ‘मी अपराधी नाही. मी बआलदैवताच्या मूर्तीची पूजा केली नाही’ असे तू मला कसे म्हणू शकतेस? तू दरीमध्ये केलेल्या गोष्टींचा विचार कर. तू काय केलेस त्याबद्दल विचार कर. एका जागेवरुन दुसऱ्या जागी धावणाऱ्या चपळ उंटिणीप्रमाणे तू आहेस.
Cross references
आदाम म्हणाला, “तू ही स्त्री माझ्यासाठी मदतनीस म्हणून दिलीस. तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि म्हणून मी ते खाल्ले.”
शमुवेल शौलजवळ पोचला तेव्हा शौलने त्याला अभिवादन केले. तो म्हणाला, “परमेश्वर तुमचे कल्याण करो. मी परमेश्वराच्या आज्ञेत आहे.”
यहूद्यांच्या दृष्टीने ती पर्वणी होती. त्यामुळे त्यादिवशी जल्लोषाचे वातावरण होते.
तो माणूस स्वतशीच खोटे बोलतो त्याला स्वतच्या चुका दिसत नाहीत म्हणून तो क्षमेची याचना करीत नाही.
तुम्ही वाईट गोष्टी करता आणि तरीही मी गप्प बसावे असे तुम्हाला वाटते तुम्ही काही बोलत नाही. आणि मी ही गप्प राहावे असे तुम्हाला वाटते. पण मी मुळीच गप्प बसणार नाही. मी हे तुम्हाला स्वच्छ सांगेन आणि तुमच्या तोंडावर टीका करीन.
माणसाने जर त्याची पापे लपवायचा प्रयत्न केला तर तो कधीही याशस्वी होणार नाही. पण जर त्याने त्याच्या पापांची कबुली दिली आणि लोकांना सांगितले की त्याचे चुकले तर देव आणि इतर लोक त्याला दया दाखवतील.
काही लोकांना आपण चांगले आहोत असे वाटत असते पण ते खरोखरच वाईट असतात.
जी स्त्री नवऱ्याशी एकनिष्ठ नसते ती तिने काहीही चूक केलेली नाही असे वागते. ती खाते, आंघोळ करते आणि तिने काहीही चूक केली नाही असे म्हणते.
तुम्हाला प्रत्येकाला हिरव्या झाडाखाली फक्त खोट्या देवांची पूजा करायची आहे. प्रत्येक झऱ्याकाठी तुम्ही मुले ठार मारता आणि खडकाळ प्रदेशात त्यांचे बळी देता.
“यहूदा, प्रियकरांच्या (खोट्या देवांच्या) पाठलाग कसा करायचा हे तुला बरोबर माहीत आहे. दुष्कृत्ये करायला खरोखरच तू शिकली आहेस.
यहूदा, टेकड्यांच्या उजाड माथ्यांकडे पाहा. अशी एक तरी जागा आहे का की जेथे तू तूझ्या प्रियकराबरोबर (खोट्या देवांबरोबर) समागम केला नाहीस? वाळवंटात वाट पाहाणाऱ्या अरबांप्रमाणे, तू प्रियकराची वाट बघत रस्त्याच्या कडेला बसलीस. तू देश ‘भ्रष्ट’ केलास. कसा? तू खूप वाईट गोष्टी केल्यास. तू माझा विश्वासघात केलास.
यहूदाच्या लोकांनी बेन हिन्नोमच्या दरीत तोफेतची उच्चस्थाने बांधली आहेत. त्या ठिकाणी लोक स्वत:च्या मुलामुलींना ठार मारतात आणि दैवताला अर्पण करण्यासाठी म्हणून जाळतात. अशी आज्ञा मी कधीही दिलेली नाही. असे काही माझ्या मनातही कधी आलेले नाही.
यहूदातील लोक त्यांच्या मर्जीप्रमाणे जगले ते दुराग्रही होते. बआल या खोट्या देवाला ते अनुसरले. त्यांच्या वडिलांनी त्यांना खोट्या देवांना अनुसरायला शिकविले.”
यहूदाच्या लोकांबद्दल देवाचे म्हणणे असे आहे: “यहूदाच्या लोकांना माझा त्याग करणे आवडते. माझा त्याग करण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. तेव्हा आता परमेश्वर त्यांचा स्वीकार करणार नाही. तो त्यांची दुष्कृत्ये लक्षात ठेवून त्यांच्या पापांबद्दल त्यांना शिक्षा करील.”
“यिर्मया, यहूदाच्या लोकांना तू ह्या गोष्टी सांग लोक तुला विचारतील ‘परमेश्वराने आमच्याबद्दल या भयंकर गोष्टी का सांगितल्या? आम्ही काय चूक केली? आम्ही आमच्या परमेश्वर देवाचे काय पाप केले?’
तू विश्वासघातकी मुलगी होतीस. पण तू बदलशील. तू घरी येण्याआधी किती वेळ वाट बघशील?” “परमेश्वराने अघटित निर्माण केले आहे. स्त्रीला पुरुषाभोवती फिरु दिले.“
मला मग परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला,
मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला,
हा होशेयला आलेला परमेश्वराचा पहिलाच संदेश होता. परमेश्वर म्हणाला, “जा आणि वेश्येशी लग्न कर. तिला मुले होऊ देत. का? कारण ह्या देशातील लोक वेश्येप्रमाणेच वागले आहेत. त्यांनी परमेश्वराचा विश्वासघात केला आहे.”
पण आपण योग्य प्रश्न विचारला आहे हे इतरांना दाखवून देण्यासाठी त्याने येशूला विचारले, “मग माझा शेजारी कोण?”
आता आपणाला माहीत आहे की, नियमशास्त्र जे सांगते ते नियमशास्त्राच्या आधिन असणाऱ्यांकरिता आहे व मनुष्यांच्या कामचुकार पणाला आळा घालण्यासाठी व सर्व जगाला चांगले व पूर्ण होण्यासाठी आहे. त्या नियमशास्त्र प्रमाणे सर्व दोषी आहेत.
जर आम्ही असे म्हणतो की, आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वत:ला फसवीत आहोत. आणिआमच्यामध्ये सत्य नाही.
तुम्ही म्हणाता,‘मी श्रीमंत आहे, मी संपत्ति मिळविली आहे. आणि मला कोणत्याही गोष्टीची गरज नाही. पण तुम्हाला याची जाणीव होतनाही की, तुम्ही नीच, नराधम, दयनीय, गरीब, आंधळे व ओंगळ आहात.