Home Bibles यिर्मया 18:2 · मराठी बायबल
यिर्मया 18:2 · मराठी बायबल

“यिर्मया, कुंभाराच्या घरी जा. मी तेथे तुला माझा संदेश देईन.”

Cross references

यशया 20:2

त्या वेळेला आमोजचा मुलगा यशया याला परमेश्वर म्हणाला, “जा तुझ्या अंगावरील शोकप्रदर्शक कपडे व जोडे काढ.” यशयाने परमेश्वराच्या आज्ञेच पालन केले आणि तो उघडा व अनवाणी चालला.

यिर्मया 13:1

परमेश्वर मला असे म्हणाला: “यिर्मया, जा आणि तागाचा घागरा विकत घे. नंतर तो नेस. तो ओला होऊ देऊ नकोस.”

यिर्मया 19:1

परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, जा आणि कुंभारकडून एक मातीचे मडके विकत घे.

यिर्मया 23:22

जर ते माझ्या स्वर्गीय सभेत उभे राहिले असते, तर त्यांनी माझा संदेश यहूदाच्या लोकापर्यंत पोहोचविला असता. त्यांनी लोकांना दुष्कृत्ये करण्यापासून परावृत्त केले असते. त्यांनी लोकांना पाप करु दिले नसते.”

यहेज्केल 4:1

“मानवपुत्रा, एक वीट घे. त्यावर यरुशलेमचे चित्र कोर

आमोस 7:7

परमेश्वराने मला पुढील गोष्टी दाखविल्या. परमेश्वर, त्याच्या हातात ओळंबा घेऊन एका भिंतीजवळ उभा होता (भिंत ओळंब्याने सरळ केलेली होती.)

प्रेषितांचीं कृत्यें 9:6

आता ऊठ आणि नगरात जा. तुला काय करायचे आहे, हे तुला तेथे कोणी तरी सांगेल.”

इब्री लोकांस 1:1

भूतकाळात देव आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे पुष्कळ वेळा वेगवेगळ्या मार्गांनी बोलला.

Interlinear

Choose Theme