Home Bibles यिर्मया 13:4 · मराठी बायबल
यिर्मया 13:4 · मराठी बायबल

तो असा होता: “यिर्मया, तू विकत आणून नेसलेला घागरा घेऊन फरातलाजा. तिथे तो खडकाला पडलेल्या चिरेत लपवून ठेव.”

Cross references

स्तोत्रसंहिता 137:1

आम्ही बाबेलच्या नद्यांजवळ बसलो आणि सियोनची आठवण काढून रडलो.

यिर्मया 51:63

हा संदेश वाचून संपताच पटाला एक दगड बांध. नंतर हा पट फरात नदीत फेकून दे.

यिर्मया 51:64

मग असे म्हण ‘बाबेल बुडेल पुन्हा ती कधीही वर येणार नाही. कारण मी तिच्यावर भयंकर संकटे आणीन.’ आणि बाबेलचे लोक थकून जातील.”येथे यिर्मयाचे बोलणे संपले.

मीखा 4:10

सियोनच्या कन्ये, तुला वेदना जाणवू दे. तू आपल्या बाळाला जन्म दे.” तुला या नगरीतून (यरुशलेममधून) बाहेर गेलेच पाहिजे. तू रानात राहशील. मला असे म्हणायचे आहे की तू बाबेलला जाशील. पण त्या ठिकाणापासून तुझे रक्षण केले जाईल. परमेश्वर तेथे जाऊन तुझी सुटका करील. तो, तुला, तुझ्या शत्रूंपासून दूर नेईल.

Interlinear

Choose Theme