“मी तुम्हाला तुमची घरे सोडून जाण्यास भाग पाडीन. तुम्ही दाही दिशांना सैरावैरा पळत सुटाल, वाळवंटातील वाऱ्याने दूर उडून जाणाऱ्या फोलकटाप्रमाणे तुमची गत होईल.
Cross references
परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी माझी तलवार उपसून तुमचा नायनाट करीन; तुमचा देश ओसाड होईल आणि तुमच्या शहरांचा नाश होईल.
परमेश्वर देव तुम्हांला वेगवेगळ्या राष्ट्रात विखरुन टाकील. आणि जेथे जेथे तो पाठवील तेथे तुमची संख्या अगदीच अल्प राहील.
परमेश्वर तुम्हाला पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्व लोकांमध्ये विखरुन टाकील. तेथे तुम्ही काष्ठपाषाणाच्या मूर्तीची उपासना कराल. तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांना माहीत नसलेल्या खोट्यानाट्या देवांची उपासना कराल.
लोकांच्या स्मृतीतून ते पुसले जातील इतका मी या इस्राएलांचा नाश केला असता.
परंतु वाईट लोक असे नसतात ते वाऱ्यावर उडून जाणाऱ्या फोलपटासारखे असतात.
देवा, तू त्यांना गवतासारखे वाऱ्यावर उडवून लाव वाऱ्याने वाळलेलं गवत इतस्तता पसरतं तस तू त्यांना पसरवून दे.
लोकांची स्थितीही त्या लाटांप्रमाणेच होईल. देव त्यांची कानउघाडणी करील आणि ते लांबवर धावत सुटतील. लोकांची स्थिती वाऱ्यावर उडून जाणाऱ्या फोलपटाप्रमाणे होईल. वावटळीत उडून जाणाऱ्या गवताप्रमाणे त्यांची अवस्था होईल.
तुम्ही त्या फेकून द्याल आणि वाऱ्याबरोबर वाहत जाऊन त्या सगळीकडे विखुरल्या जातील. नंतर तुम्ही परमेश्वराबद्दल आनंद मानाल. तुम्हाला इस्राएलच्या पवित्र (देवाबद्दल) अभिमान वाटेल.”
त्या वेळेला यहुदा व यरुशलेम येथील लोकांना एक संदेश दिला जाईल. “उजाड टेकड्यावरुन गरम वारा वाहतो. तो वाळवंटातून माझ्या लोकांकडे वाहत येतो. फोलकटापासून धान्य वेगळे करण्याकरिता शेतकरी ज्या वाऱ्याचा उपयोग करतात, तसा हा सौम्य वारा नाही.”
मी यहूदाच्या लोकांची फाटाफूट करीन. ते त्यांच्या शत्रूंपासून पळ काढतील. पूर्वेकडचा वारा ज्याप्रमाणे सर्व वस्तू दूर उडवून देतो, त्याप्रमाणे मी यहूदातील लोकांना दूर पसरवून देईन. मी त्या लोकांचा नाश करीन. मी त्यांच्या मदतीला येत आहे, असे त्यांना दिसण्याऐवजी, मी त्यांना सोडून जाताना दिसेन.”
तुमचे एक तृतीयांश लोक रोगराईने व उपासमारीने नगरातच मरतील. एक तृतीयांश नगराबाहरे लढाईत मरतील. आणि उरलेल्या एक तृतीयांश लोकांचा माझी तलवार, दूरवरच्या देशांपर्यंत पाठलाग करील. तुमच्या आजूबाजूला राहणारे लोक त्यांना लढाईत ठार करतील. मगच माझा राग शांत होईल.
देव म्हणाला, “तुमच्यातील काही लोकांना मी निसटू देईन. ते दुसऱ्या देशांत थोड्या काळाकरिता राहतील. मी त्यांना विखरुन टाकीन आणि दुसऱ्या देशांत राहायला भाग पाडीन.
मी त्याच्या सैन्याचा नाश करीन. त्याचे चांगले सैनिक मी नष्ट करीन. वाचलेल्या लोकांना मी वाऱ्यावर सोडून देईन. मग तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. आणि मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या.”
ह्याच कारणामुळे ते लोक लवकरच अदृश्य होतील. सकाळच्या धुक्याप्रमाणे त्यांची स्थिती होईल. सकाळी धुके थोड्यावेळ दिसते. व लगेच नाहीस होते. इस्राएलींची दशा खळ्यातून उडणाऱ्या फोलकटाप्रमाणे होईल. धुराड्यातून निघणारा धूर काही क्षणातच दिसेनासा होतो, तसे त्याचे होईल.
मलूल होऊन सुकून जाणाऱ्या फुलाप्रमाणे तुमचे जीवन होण्याआधीचे तुमचे आचार बदला. दिवसाच्या उष्णतेने, फूल कोमेजून वाळून जाते. परमेश्वराने आपला क्रोध प्रकट करताच, तुमचीही स्थिती तशीच होईल. म्हणून परमेश्वराचा क्रोधाचा दिवस तुमच्यावर येण्यापूर्वीच तुमचे आचरण बदला.
ते तरवारीच्या धारेने पडतील आणि त्यांना बंदीवान करुन राष्ट्रांत नेतील आणि यहूदीतर लोकांचा काळ संपेपर्यंत यहूदीतर राष्ट्रे यरुशलेम पायाखाली तुडवतील.