Home Bibles याकोब 5:12 · मराठी बायबल
याकोब 5:12 · मराठी बायबल

याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे बंधूंनो, स्वर्गाच्या किंवा पृथ्वीच्या नावाने शपथ वाहायचे थांबवा किंवा इतर कोणत्याही प्रकारची शपथ वाहू नका. तुमचे “होय” हे “होयच” असू द्या. तुमचे “नाही” हे “नाहीच” असू द्या, यासाठी की तुम्ही देवाच्या परीक्षेत येऊ नये.

Cross references

मत्तय 5:33

“जेव्हा तू शपथ घेतोस तेव्हा ती तोडू नको. जी शपथ देवाला वाहिली आहे ती खरी कर,असे सांगितल्याचे तुम्ही ऐकले आहे.

मत्तय 23:16

“तुम्हांला दु:ख होईल. आंधळ्या वाटाड्यांनो, जे तुम्ही म्हणता जर एखादा मंदिराच्या नावाने शपथ घेतो तर त्याने ती पाळलीच पाहिजे याचे बंधन त्याच्यावर नाही, पण जर एखादा मंदिरातील सोन्याची शपथ घेऊन बोलतो, तर त्याने ती शपथ पाळलीच पाहिजे.

1 करिंथकरांस 11:34

जर कोणी खरोखरच भुकेला असेल तर त्याने घरी खावे यासाठी की तुम्ही न्यायनिवाड्यासाठी एकत्र जमू नये. मी येईन तेव्हा इतर गोष्टी सुरळीत करुन देईन.

2 करिंथकरांस 1:17

जेव्हा मी असा बेत केला, तेव्हा तो मी गंभीरपणे विचार न करता केला काय? किंवा मी माझ्या योजना जगाच्या रीतीप्रमाणे करतो काय, म्हणजे मी एकाच वेळेला “होय, होय” आणि “नाही, नाही” असे म्हणतो काय?

याकोब 3:1

माझ्या बंधूंनो, तुमच्यापैकी पुष्कळजण शिक्षक होऊ पाहत नाहीत काय? तुम्हांला माहीत आहे की, जे आपण शिक्षक आहोत त्या आपला काटेकोरपणे न्याय होईल.

1 पेत्र 4:8

सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की, एकमेकांवर सत्याने प्रेम करा. कारण प्रेम पापाच्या राशीवर पांघरुण घालते.

3 योहान 1:2

माझ्या प्रिय मित्रा, जसे आध्यात्मिक जीवनात तुझे चांगले चालले आहे हे मला माहीत आहे तसेच इतर बाबतीतही तुझेचांगले चालावे आणि तुझे आरोग्य चांगले असावे अशी मी प्रार्थना करतो.

Interlinear

Choose Theme