Home Bibles याकोब 2:25 · मराठी बायबल
याकोब 2:25 · मराठी बायबल

त्याचप्रमाणे राहाब वेश्येने इस्राएली हेरांना आसरा देऊन, काही वेळानंतर निराळया वाटेने तेथून निसटून जाण्यासाठी मदत केली. तेव्हा ही कृती तिचे नीतिमत्त्व मानले गेले नाही काय?

Cross references

यहोशवा 2:1

नूनाचा मुलगा यहोशवा आणि सर्व लोक यांचा तळ शिट्टीम (अकेशिया) येथे होता. तेव्हा कोणाच्याही नकळत यहोशवारे दोन हेर पाठवले. “तुम्ही जाऊन तो देश व विशेषत: यरीहो पाहून या.” असे सांगून त्याने त्या दोन हेरांना पाठवले.त्या प्रमाणे ती माणसे यरीहोला गेली. रहाब नावाच्या एका वेश्येच्या घरी ते जाऊन राहिले.

यहोशवा 2:4

तिने खरे तर त्या दोघांना लपवले होते. पण ती म्हणाली, “दोघेजण इथे आले होते खरे,पण कुठून आले हे मला माहीत नाही.

यहोशवा 2:6

(पण प्रत्यक्षात तिने त्यांना घराच्या छपरावर नेऊन अंबाडीच्या गंजीत लपवले होते.)

यहोशवा 2:15

या स्त्रीचे घर तटबंदीच्या भिंतीतच बांधलेले होते. तेव्हा तिने दोराच्या साहाय्याने या दोघांना खिडकीतून खाली उतरवले.

यहोशवा 2:19

या घरात राहणाऱ्या सर्वांचे आम्ही रक्षण करू. त्यांच्यापैकी कोणालाही काही इजा झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर राहील. पण येथून कोणी बाहेर पडल्यास तो मारला जाऊ शकेल मग आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही. ती त्याचीच चूक असेल.

यहोशवा 6:17

हे शहर आणि यातील सर्वकाही परमेश्वराचे आहे.फक्त रहाब ही वेश्या आणि तिच्या घरातील मंडळी यांना धक्कालावू नका. रहाबने आपल्या दोन हेरांना लपविले तेव्हा तिच्या घरातल्यांना मारू नका.

यहोशवा 6:22

यहोशवा त्या दोन हेरांशी बोलला. तो त्यांना म्हणाला, “त्या वेश्येच्या घरी जा आणि तिला व तिच्या घरातल्यांना घेऊन या. तिला तुम्ही तसे वचन दिले आहे तेव्हा त्यांना तेथून बाहेर काढा.”

मत्तय 1:5

सल्मोन बवाजाचा पिता होता. (बवाजाची आई राहाब होती.) बवाज ओबेदचा पिता होता. (ओबेदची आई रूथ होती) ओबेद इशायचा पिता होता.

मत्तय 21:31

त्या दोघांपैकी कोणत्या मुलाने वडीलांची आज्ञा पाळली?” ते म्हणाले, पहिल्या मुलाने.”येशू त्यांना म्हणाला, मी खरे सांगतो, जकातदार व वेश्या हे वाईट लोक आहेत असे तुम्हांला वाटते, पण ते तुमच्या अगोदर स्वर्गाच्या राज्यात जातील.

इब्री लोकांस 11:31

राहाब वेश्येच्या विश्वासामुळेच ज्या लोकांनी आज्ञा मोडली त्यांच्याबरोबर ती मारली गेली नाही कारण तिने हेरांचे शांतीने स्वागत केले.

याकोब 2:18

पण एखादा म्हणेल, “तुझ्याकडे विश्वास आहे तर माझ्याकडे काम आहे.” कृतीशिवाय तुझा विश्वास दाखव, आणि माझा विश्वास मी माझ्या कृतीने दाखवीन.

याकोब 2:22

तू पाहतोस की त्याच्या कृतीमध्ये विश्वाससुद्धा बरोबरीने कार्यरत होता व त्याचा विश्वास त्याच्या कृतीमुळे पूर्ण झाला.

Interlinear

Choose Theme