कोणीही, जेव्हा तो परीक्षेत पडतो, तेव्हा असे म्हणू नये की, “हे संकट देवाने माझ्यावर आणले.” कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह पडणार नाही आणि तो कोणालाही मोहात पाडत नाही.
Cross references
आदाम म्हणाला, “तू ही स्त्री माझ्यासाठी मदतनीस म्हणून दिलीस. तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि म्हणून मी ते खाल्ले.”
परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्यापासून दूर का ढकलीत आहेस? तुला अनुसरणे तू आम्हाला कठीण का करीत आहेस? परमेश्वरा, आमच्याकडे परत ये. आम्ही तुझे सेवक आहोत. आमच्याकडे ये आणि आम्हाला मदत कर. आमची कुटुंबे तुझ्या मालकीची आहेत.
“गाव वसविण्यासाठी लोकांना ठार मारुन नेत्यांनी पाप केले, ते त्यांच्यासाठी वाईट आहे.
तुमच्यापैकी एखादा मला म्हणेल, “देव जर आमच्या कृति नियंत्रित करतो तर तो अजूनही आमचे दोष का काढतो? शेवटी त्याच्या इच्छेला कोण विरोध करील?”
माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळया परीक्षा येतील तेव्हा तुम्ही स्वत:ला अत्यंत सुदैवी समजा,
धन्य तो पुरूष जो त्याच्या परीक्षेत टिकतो, कारण जेव्हा ती परीक्षा तो उत्तीर्ण होईल, तेव्हा त्याला विजेत्याचा मुगूट मिळेल. तो मुगुट देवाने जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांना देण्याचे अभिवचन दिले आहे.