Home Bibles यशया 9:11 · मराठी बायबल
यशया 9:11 · मराठी बायबल

म्हणून परमेश्वर इस्राएलच्याविरूध्द लढण्यासाठी लोकांना समर्थ करील. परमेश्वर रसीनच्या शत्रूंना इस्राएलविरूध्द उठवील.

Cross references

2 राजे 15:29

अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर हा इस्राएलवर चाल करुन आला. पेकह इस्राएलचा राजा होता तेव्हा हे घडले. तिग्लथ-पिलेसरने इयोन, आबेल, बेथ माका, यानोह, केदेश, हासोर, गिलाद, गालील आणि सर्व नफताली प्रांत घेतला. तसेच तेथील सर्व लोकांना कैद करुन अश्शूरला नेले.

2 राजे 16:9

अश्शूरच्या राजानेही आहाजच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि दिमिष्कावर स्वारी केली. दिमिष्क सर करुन तेथील लोकांना त्याने कीर येथे पकडून नेले. रसीनलाही त्याने ठार केले.

यशया 5:25

म्हणून परमेश्वर त्यांच्यावर रागावला आहे. तो आपला हात त्यांच्यावर उगारेल आणि त्यांना शिक्षा करील. मग डोंगरसुध्दा भीतीने कापतील. मृतदेह कचऱ्याप्रमाणे रस्त्यावर पडतील. पण तरीही देवाचा राग शांत होणार नाही. त्याचा हात लोकांना शिक्षा करण्याकरीता उगारलेलाच राहील.

यशया 7:8

आता एफ्राइम (इस्राएल) एक राष्ट्र आहे पण 65 वर्षांनी ते राष्ट्र म्हणून राहाणार नाही. तेव्हा, जोपर्यंत रसीन हा दमास्कसचा राजा आहे

यशया 8:4

कारण तो मुलगा ‘आई-बाबा’ असे बोलायला लागण्यापूर्वीच देव दमास्कसची व शोमरोनची सर्व धनसंपत्ती काढून अश्शूरच्या राजाला देईल.”

यशया 10:4

कैद्याप्रमाणे तुम्हाला वाकावे लागेल, मृताप्रमाणे तुम्हाला जमिनीवर पडावे लागेल. पण एवढ्यानेही भागणार नाही. कारण अजूनही देवाचा राग शांत झाला नसेल. अजूनही देव शिक्षा करण्याच्या तयारीत असेल.

यशया 10:9

कालनो शहर कर्कमीश शहरासारखे, हमाथ अर्पादसारखे व शोमरोन दमास्कससारखे आहे.

यशया 17:1

दमास्कसला हा शोक संदेश आहे. परमेश्वर म्हणतो की पुढील गोष्टी दमास्कसला घडतील.“आता दमास्कस एक शहर आहे. पण त्याचा नाश होईल. फक्त पडझड झालेल्या इमारती तेथे शिल्लक राहतील.

यशया 28:1

शोमरोनकडे पाहा. एफ्राइममधील मद्यप्यांना त्या शहराचा फार गर्व आहे. आजूबाजूला सुपीक दरी असलेल्या टेकडीवर ते शहर वसले आहे. शोमरोनमधील रहिवाशांना आपले शहर फुलांच्या सुंदर मुकुटाप्रमाणे वाटते. पण ते मद्यपान करून धुंद झाले आहेत आणि हा “सुंदर मुकुट” सुकून चालला आहे.

Interlinear

Choose Theme