Home Bibles यशया 62:5 · मराठी बायबल
यशया 62:5 · मराठी बायबल

एखादा तरूण एखाद्या स्त्रीवर प्रेम करतो. मग तो तिच्याशी लग्न करतो व ती त्याची पत्नी होते. त्याचप्रमाणे ही भूमी तुझ्या मुलांची होईल. नवविवाहित माणूस खूप सुखी असतो, तसाच देव तुझ्याबरोबर सुखी होईल.”

Cross references

स्तोत्रसंहिता 45:11

राजाला तुझे सौंदर्य आवडते. तो तुझा नवा नवरा (स्वामी) असेल. तू त्याला मान देशील.

गीतरत्न 3:11

सियोनेच्या स्त्रियांनो, बाहेर या, आणि राजा शलमोनाला पाहा. ज्या दिवशी त्याचे लग्र झाले, ज्या दिवशी तो खूप आनंदी होता, त्या दिवशी त्याच्या आईने त्याच्या मस्तकावर ठेवलेला मुकुट पाहा.

यशया 49:18

वर पाहा, तुमच्या सभोवती पाहा. तुझी मुले एकत्र गोळा होऊन तुझ्याकडे येत आहेत. परमेश्वर म्हणतो, “मी प्रत्यक्ष आहे आणि मी तुला पुढील गोष्टींचे वचन देतो. तुझी मुले गळ्यात शोभून दिसणाऱ्या रत्नांप्रमाणे होतील. नववधूने गळ्यात घालायच्या हाराप्रमाणे ती होतील.

यशया 62:4

‘देवाने त्याग केलेली माणसे’ असे तुम्हाला कधीही कोणी म्हणणार नाही. तुमच्या भूमीला ‘देवाने नाश केलेली’ असे कोणी केव्हाही म्हणणार नाही. उलट, तुम्हाला ‘देवाची आवडती माणसे’ असे म्हणतील तुमच्या भूमीला ‘देवाची वधू’ म्हणतील. का? कारण परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमची भूमी त्याच्या मालकीची आहे.

यशया 65:19

“मग यरूशलेमबरोबर मलाही आनंद होईल. मी माझ्या लोकांबरोबर सुखी होईन. त्या नगरीत पुन्हा कधीही आक्रोश व दु:ख असणार नाही.

यिर्मया 32:41

ते मला प्रसन्न ठेवतील. त्यांचे भले करण्यात मला मौज वाटेल. मी त्यांना ह्या भूमीत रुजवीन आणि वाढवीन. मी माझ्या अंत:करणापासून हे करीन.”‘

होशेय 2:21

मी त्या वेळेला प्रत्युत्तर देईन.” परमेश्वर असे म्हणतो. “मी आकाशाशी बोलेन व तो पृथ्वीवर पाऊस पाडील.

सफन्या 3:17

परमेश्वर तुझा देव, तुमच्याबरोबर आहे. तो बलवान वीराप्रमाणे आहे. तो तुला वाचवील. तो तुझ्यावर किती प्रेम करतो, हे तो तुला दाखवून देईल. तुझ्याबरोबर तो किती सुखी आहे, हेही तुला दिसेल.

मलाखी 3:12

“इतर राष्ट्रांतील लोक तुमच्यांशी चांगले वागतील तुमचा देश खरोखरच विळक्षण आनंददायक होईल.” सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणाला.

इब्री लोकांस 12:2

जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केंद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या सिंहासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.

Interlinear

Choose Theme