“मला कोणत्या प्रकारचा दिवस अभिप्रेत आहे ते मी तुम्हाला सांगीन. तो दिवस लोकांच्या मुक्ततेचा असावा, त्या दिवशी लोकांची ओझी तुम्ही हलकी करावी, अडचणीत असलेल्या लोकांना त्यातून सोडवावे, त्यांच्या खांद्यावरची ओझी तुम्ही उतरवावी.
Cross references
खोटे वचन देऊन न केलेले काम त्या प्रत्येकाबद्दल त्याने पूर्ण भरपाई करावी आणि त्या त्या वस्तूंच्या किंमतीचा पांचवा हिस्सा अधिक भरावा. त्याने खऱ्या मालकाला पैसे द्यावेत; दोषार्पण आणण्याच्या दिवशीच त्याने हे करावे.
माझ्या वडीलांनी तुमच्यावर फार ओझे लादले ना! मी तर ते अधिकच भारी करणार आहे. माझ्या वडलांनी तुम्हाला चाबकांचे फटकारे मारले. मी त्या चाबकांना धातूची अणकुचीदार टोके लावून शासन करीन.”
आता माझे ऐका. पकडून आणलेल्या या आपल्या भावाबहिणींना परत पाठवून द्या. परमेश्वराला तुमचा अनावर संताप आला आहे.”
माझे लोक,माझे भाऊ आणि मी सुध्दा लोकांना पैसे आणि धान्य उधार देत आहोत. पण त्यावरचे व्याज त्यांना सक्तीने द्यायला लावणे थांबवले पाहिजे.
त्यांची शेती, द्राक्षमळे, जैतुनाचे मळे आणि घरे तुम्ही त्यांना आत्ताच्या आत्ता परत करा. त्यांना लावलेले व्याजही तुम्ही परत करा. त्यांना जे पैसे, धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल तुम्ही कर्जाऊ दिलेत त्यावर तुम्ही एक टक्का व्याज लावले आहे. ते तुम्ही त्यांना परत करा.”
नंतर तुम्ही परमेश्वराला हाक मारल्यास परमेश्वर तुमच्या हाकेला ओ देईल. तुम्ही त्याचा धावा केल्यास तो म्हणेल, “हा मी येथे आहे.”लोकांना त्रास देण्याचे व त्यांच्या दु:खाचे ओझे वाढविण्याचे तुम्ही थांबवावे. तुम्ही लोकांना कटू शब्द वापरू नयेत आणि प्रत्येक गोष्टीबद्दल दोष देऊ नये.
सर्व इब्री गुलांमांना स्वातंत्र्य देण्याचा करार सिद्कीया राजाने यरुशलेमच्या सर्व लोकांबरोबर केला होता. हा करार झाल्यावर यिर्मयाला देवाचा संदेश आला.
प्रत्येक माणसाने व प्राण्याने दु:ख प्रकट करणारे वस्त्र पांघरले पाहिजे. माणसांनी परमेश्वरापाशी टाहो फोडला पाहिजे. प्रत्येकाचे जीवन बदलले पाहिजे आणि वाईट कर्मे करावयाचे थांबविले पाहिजे.
पण तुम्ही चांगल्याचा तिरस्कार करता आणि वाईटावर प्रेम करता. तुम्ही लोकांची चामडी सोलता. त्यांच्या हाडांवरुन मांस ओढून काढता.
सर्व शक्तिमान परमेश्वर असे म्हणतो की “जे योग्य व न्याय्य आहे तेच तुम्ही करा. एकमेकांवर दया करा. एकमेकांना करुणा दाखवा.
जे सर्व गुलाम म्हणून विधर्मी मालकाच्या जुवाखाली काम करीत आहेत त्यांनी त्यांच्या मालकांना पूर्ण आदर देण्यायोग्य समजावे. यासाठी की देवाच्या नावाची आणि आमच्या शिक्षणावर अशीतशी टीका होणार नाही.