मग तुम्ही त्या अंथरूणात शिरता आणि त्या खोट्या देवांवर प्रेम करता. अशाप्रकारे वागणे हे माझ्याविरूध्द आहे. असे वागून तुम्ही पापे करता. तुम्ही त्या देवांवर प्रेम करता. त्यांची नग्न शरीरे पाहायला तुम्हाला आवडते. प्रथम तुम्ही माझ्याबरोबर होता. पण त्यांच्यासाठी तुम्ही मला सोडले. माझी आठवण तुम्हाला करून देणाऱ्या वस्तू तुम्ही लपवून ठेवता. तुम्ही अशा वस्तू दारामागे वा दाराच्या खांबामागे लपवून ठेवता व मग त्या खोट्या देवांकडे जाऊन त्यांच्याबरोबर करार करता.
Cross references
देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, त्या भिंतीला छिद्र पाड.” मी तसेच केले. तेथे मला एक दार दिसले.
प्रत्येक रस्त्याच्या सुरवातीला तू मातीचे ढिगारे रचलेस. तू तुझ्या सौंदर्याला कमीपणा आणलास, तुझ्या सौंदर्याचा उपयोग तू तुझ्या जवळून जाणाऱ्या प्रत्येकाला पकडण्यासाठी केलास. त्यांना तुझे पाय दिसावे म्हणून तू तुझी वस्त्रे वर उचललीस आणि त्यांच्याबरोबर वेश्येसारखी वागलीस.
“व्यभिचारिणी, तुला स्वत:च्या पतीऐवजी परक्यांबरोबर व्यभिचार करायला आवडतो.
“मानवपुत्रा, शोमरोन व यरुशलेम ह्यांची गोष्ट ऐक, दोन 1बहिणी होत्या. त्यांनी एकाच आईच्या पोटी जन्म घेतला होता.
तुम्ही सुंदर शय्येवर बसलात व पुढे टेबल ठेवून त्यावर माझा धूप व तेल ठेवलेत.