Home Bibles यशया 42:22 · मराठी बायबल
यशया 42:22 · मराठी बायबल

पण लोकांकडे पाहा. दुसऱ्यांनी त्यांना पराभूत करून लटूले आहे. सर्व तरूण घाबरले आहेत. ते तुरूंगात बंद केले गेले आहेत. दुसऱ्या लोकांनी त्यांच्याकडून पैसा काढून घेतला आहे. त्यांना वाचविणारा कोणीही नाही. दुसऱ्यांनी त्यांचा पैसा घेतला आणि “तो परत दे” असे म्हणायला तेथे कोणीही नव्हते.

Cross references

अनुवाद 28:29

भर दिवसा आंधळ्यासारखे चाचपडत चालाल. प्रत्येक कामात अपयशाचे धनी व्हाल. लोक तुम्हाला एकसारखे नागवतील, दुखावतील. आणि तुम्हाला कोणी त्राता राहणार नाही.

अनुवाद 28:33

“तुमच्या जमिनीचे उत्पन्न आणि तुमच्या साऱ्या श्रमाचे फळ एखादे अपरिचित राष्ट्र बळकावेल. लोक तुमची उपेक्षा करतील.

स्तोत्रसंहिता 50:22

तुम्ही लोक देवाला विसरला आहात. मी तुम्हाला फाडून टाकण्यापूर्वीच तुम्ही हे सारे लक्षात घ्या जर तसे घडले तर तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही.

स्तोत्रसंहिता 102:20

आणि तो कैद्यांची प्रार्थना ऐकेल. ज्यांना मृत्युदंड झाला आहे त्यांना तो सोडवेल.

यशया 1:7

“तुमच्या देशाचा नाश झाला आहे. तुमची शहरे जाळली गेली आहेत. तुमच्या शत्रूंनी तुमचा देश काबीज केला आहे. सैन्यांनी एखादा देश उद्ध्वस्त करावा तशी तुमची भूमी झाली आहे.

यशया 5:29

ते गर्जना करतात आणि त्या गर्जना एखाद्या तरूण सिंहाच्या गर्जनेइतक्या मोठ्या असतात. जे लोक त्यांच्याशी लढतात त्यांना ते गुरगुरत पकडतात. लोक झगडतात आणि पळून जाण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना वाचविणारा तेथे कोणीही नसतो.

यशया 14:17

ज्याने शहरांचा विध्वंस करून सर्व जमिनीचे वाळवंट केले तो हाच मनुष्य का? ज्यांने युध्दात लोकांना कैदी केले व त्यांना घरी जाऊ दिले नाही तो हाच का?”

यशया 18:2

तेथील लोक बांबूच्या नावातून समुद्र पार करतात.शीघ्रगती दुतांनो, त्या उंच आणि बलवान लोकांकडे जा. (ह्या उंच व धडधाकट लोकांना इतर लोक घाबरतात. त्याचे राष्ट्र बलशाली आहे. त्यांच्या राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राचा पराभव केला आहे. त्यांचा देश नद्यांनी विभागलेला आहे.)

यशया 24:3

सर्व लोकांना देशातून बळजबरीने हाकलून दिले जाईल. सर्व संपत्ती लुटली जाईल. परमेश्वराच्या आज्ञेवरून हे घडेल.

यशया 24:18

लोकांना संकटाची चाहूल लागून ते घाबरून जातील. काही लोक सैरावैरा पळतील. पण ते खाचखळग्यात पडतील आणि सापळ्यात अडकतील. त्यातील काही खड्ड्यातून चढून बाहेर येतील. पण ते दुसऱ्या सापळ्यात अडकतील,” आकाश फाटेल आणि प्रलय होईल. पृथ्वीचा पाय कापू लागेल.

यशया 24:22

खूप राजे एकत्र जमतील आणि त्यांना तुरूंगात टाकले जाईल. पण शेवटी, बऱ्याच काळानंतर, त्यांना न्याय दिला जाईल.

यशया 36:1

हिज्कीया यहुदाचा राजा होता. सन्हेरीब अश्शूरचा राजा होता. हिज्कीयाच्या कारकिर्दीच्या चौदाव्या वर्षी सन्हेरीबने यहुदाच्या तटबंदी असलेल्या नगरांविरूध्द उठाव केला आणि त्यांचा पाडाव केला.

यशया 42:7

आंधळ्यांचे डोळे तू उघडशील आणि ते पाहू शकतील. खूप लोक तुरंगात आहेत, त्यांना तू मुक्त करशील. खूप लोक अंधारात राहतात, त्यातून तू त्यांना बाहेर काढशील.

यशया 45:13

कोरेशला चांगल्या गोष्टी करण्यासाठी मीच शक्ती दिली.मी त्याचे काम सोपे करीन. कोरेश माझी नगरी पुन्हा वसवेल. तो माझ्या लोकांना मुक्त करील. तो माझ्या लोकांना मला विकणार नाही. ह्या गोष्टी करण्यासाठी मला त्याला काही द्यावे लागणार नाही. लोक मुक्त केले जातील. आणि त्यासाठी मला काही मोजावे लागणार नाही.”सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.

यशया 51:23

आता तुला ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर मी माझा राग काढीन व त्यांना शिक्षा करीन. त्या लोकांनी तुला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ते तुला म्हणाले, ‘आमच्यापुढे वाक. आम्ही तुला तुडवून जाऊ.’ त्यांनी बळजबरीने तुला वाकविले आणि माती तुडवल्याप्रमाणे ते तुझ्या पाठीवरून चालले. तू जणू काही त्यांचा रस्ता होतीस.”

यशया 52:4

परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “माझ्या माणसांनी प्रथम मिसरमध्ये वस्ती केली आणि मग ते गुलाम झाले, नंतर अश्शूरने त्यांना गुलाम केले.

यशया 56:9

वन्य पशूंनो, या व खा.

यिर्मया 50:17

“सर्व देशभर पसरलेल्या मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे इस्राएल आहे. सिंहाने पाठलाग करुन दूर पळवून लावलेल्या मेंढराप्रमाणे इस्राएल आहे. त्यांच्यावर प्रथम हल्ला करणारा सिंह म्हणजे अश्शूरचा राजा आणि त्याची हाडे मोडणारा अखेरच सिंह म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर होय.”

यिर्मया 51:34

सियोनचे लोक म्हणतील, “बाबेलच्या राजा नबुखद्नेस्सरने पूर्वी आमचा नाश केला. पूर्वी त्याने आम्हाला दुखावले. त्याने आमचे लोक नेले, व त्यामुळे आमची स्थिती रिकाम्या रांजणासारखी झाली. आमच्याजवळचे जेवढे चांगले, तेवढे त्याने नेले, आणि आम्हाला दूर फेकून दिले. तो पोट भरेपर्यंत आम्हाला खाणाऱ्या एखाद्या प्रचंड राक्षसासारखा होता.

यिर्मया 52:4

म्हणून सिद्कीयाच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने यरुशलेमवर चाल केली. त्याने आपले सर्वच्या सर्व सैन्य बरोबर घेतले. त्या सैन्याने यरुशलेमच्या बाहेर तळ ठोकला. मग यरुशलेमचा तट ओलांडून जाण्यासाठी त्यांनी तटाभोवती उतरंडी तयार केल्या.

यिर्मया 52:31

यहूदाचा राजा यहोयाकीन हा 37वर्षे बाबेलच्या तुरुंगात होता. त्याच्या तुरुंगवासाच्या 37व्या वर्षी बाबेलचा राजा अवीलमरदोख ह्यास त्याची दया आली व त्याने त्याची मुक्तता केली. त्याच वर्षी अवील-मरदोख गादीवर बसला होता. त्याने 12व्या महिन्याच्या 25व्या दिवशी यहोयाकीमची सुटका केली.

लूक 19:41

जेव्हा तो जवळ आला व त्याने शहर पाहिले, तेव्हा तो त्यासाठी रडला. आणि म्हणाला,

लूक 21:20

जव्हा तुम्ही यरुशलेमाला सैन्यानी वेढा घातलेला पाहाल, तेव्हा तुम्हांला कळून येईल की, तिचा नाश होण्याची वेळ आली आहे.

Interlinear

Choose Theme