पायासाठी तो न कुजणारे विशेष प्रकारचे लाकूड निवडतो. नंतर तो चांगला सुतार शोधतो आणि “देवाच्या” मूर्तीसाठी भक्कम पाया तयार करतो.
Cross references
दुसऱ्या दिवशी अश्दोदचे लोक उठून पाहतात तो, दागेनची मूर्ती करार कोशा जवळ जमीनीवर पालथी पडलेली आढळली.
तुमचा देश लोक पूजत असलेल्या मूर्तीनी भरून गेला आहे. लोकच त्या मूर्ती घडवितात आणि त्यांची पूजा करतात.
एकजण मूर्ती करण्यासाठी लाकूड कापतो. तो सोन्याचे काम करणाऱ्याला उत्तेजन देतो. दुसरा हातोडीने धातू मऊ करतो. तो ऐरणी वर घाव घालणाऱ्याला उत्तर देतो हा शेवटचा कामगार म्हणतो, ‘हे काम चांगले झाले. सोने आता निघून येणार नाही.’ नंतर तो खिळ्याने मूर्ती पायावर पक्की बसवितो. मग मूर्ती खाली पडू शकत नाही आणि ती कधीही सरकत नाही.”
दुसरा कारागीर ओळंबा आणि कर्कटक यांच्या साहाय्याने लाकडावर कापण्यासाठी रेषा आखून घेतो. मग छिन्नीने लाकडातून तो मूर्ती कोरतो. तो मोजपट्टीने मूर्तीचे मोजमाप करतो. अशा तऱ्हेने कारागीर हुबेहूब मनुष्याप्रमाणे दिसणारी मूर्ती करतो आणि ही माणसाची मूर्ती घरात बसून राहण्यापलीकडे काहीही करीत नाही.
ते स्वत:च्या खांद्यांवरून तो खोटा देव वाहून नेतात. तो देव निरूपयोगी आहे. लोकांना त्यास वाहून न्यावे लागते. लोक मूर्ती जमिनीवर बसवितात. तो देव हालू शकत नाही. तो त्याची जागा सोडून लांब जाऊ शकत नाही. लोक त्याच्याशी ओरडून बोलले तरी तो उत्तर देणार नाही, तो देव म्हणजे फक्त एक मूर्ती आहे, ती लोकांना संकटातून वाचवू शकणार नाही.
त्या लोकांच्या चालीरीती अर्थशून्य आहेत. त्यांच्या मूर्ती म्हणजे दुसरे काही नसून जंगलातील लाकडे आहेत कामगार लाकूड पटाशीने छिनून त्या मूर्ती बनवितो.
नाही! तू नम्र झाला नाहीस उलट तू स्वर्गातल्या देवाच्याविरुध्द गेलास. देवाच्या मंदिरातील प्याले आणण्याचा तू हुकूम दिलास. त्या प्याल्यातून तू, तुझे राजदरबारी, तुझ्या स्त्रिया आणि दासी मद्य प्यालात, आणि सोने-चांदी, कासे, लोखंड, लाकूड वा दगड यांच्यापासून बनविलेल्या देवतांची तू स्तुती केलीस. ते खरे देव नाहीत. ते पाहू शकत नाहीत ऐकू शकत नाहीत. त्यांना काही समजत नाही तू, तुझ्या जीवनावर व तू करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर ज्या देवाचे प्रभुत्व आहे, त्याचा मान राखला नाहीस.