Home Bibles यशया 30:12 · मराठी बायबल
यशया 30:12 · मराठी बायबल

इस्राएलचा पवित्र देव म्हणतो, “परमेश्वराने दिलेला संदेश तुम्ही स्वीकारायचे नाकारले आहे. तुम्ही लोक जुलूम व कपट यांवर विसंबून राहता.

Cross references

2 शमुवेल 12:9

असे असताना तू परमेश्वराची आज्ञा का मोडलीस? त्याच्या दृष्टीने वाईट असे कृत्य का केलेस? उरीया हित्तीला तू तलवारीने मारलेस आणि त्याच्या बायकोचा स्वत:ची बायको म्हणून स्वीकार केलास. होय, अम्मोन्यांच्या तलवारीने तू त्याचा वध करवलास.

स्तोत्रसंहिता 52:7

व म्हणतील, “जो देवावर अवलंबून नव्हता त्याचे काय झाले पाहा त्याची संपत्ती आणि त्याचे खोटे बोलणे त्याला वाचवू शकेल असे त्याला वाटत होते.”

स्तोत्रसंहिता 62:10

बळजबरीने वस्तू हिसकावून घेण्यात शक्तीवर विसंबून राहू नका. चोरी केल्यामुळे तुमच्या पदरात काही पडणार आहे असे समजू नका आणि तुम्ही श्रीमंत झाल्यामुळे तुमची श्रीमंती आता तुमच्या कामी येईल याचाही भरंवसा ठेवू नका.

यशया 5:7

सर्वशक्तिमान परमेश्वराच्या मालकीचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएल हा देश होय. ज्या द्राक्षवेली परमेश्वराला प्रिय आहेत त्या म्हणजे यहुदी लोक होत.परमेश्वराने न्यायाची आशा केली पण तेथे फक्त हत्याच घडली. परमेश्वराने प्रामाणिकपणाची आशा धरली पण तेथे फक्त वाईट रितीने वागविलेल्या लोकांचे आक्रोश होते.

यशया 5:24

अशा लोकांचे वाईट होईल. ज्याप्रमाणे आगीमध्ये पाने आणि गवत जळून भस्मसात होते त्याप्रमाणे त्यांच्या वंशजांचा पूर्णपणे नाश होईल. अंकुर मरून धुळीला मिळावा अथवा आगीत फूल जळून त्याची राख वाऱ्यावर कोठल्या कोठे उडून जावी तसाच त्यांच्या वंशजांचा समूळ नाश होईल.त्या लोकांनी, सर्वशक्तिमान परमेश्वराची आज्ञा मानण्यास, नकार दिला. इस्राएलच्या पवित्र देवाच्या संदेशाचा त्यांनी तिरस्कार केला.

यशया 28:15

तुम्ही लोक म्हणता, “आम्ही मृत्यूबरोबर करारनामा केला आहे. अधोलोकाशी आम्ही करार केला आहे म्हणून आम्हांला शिक्षा होणार नाही. शिक्षा आमचे काही वाकडे करू शकणार नाही. कारण आम्ही कपट व असत्य याच्यांमागे लपून बसू.”

यशया 30:1

परमेश्वर म्हणतो, “ह्या मुलांकडे पाहा! ती माझ्या आज्ञा पाळत नाहीत. ते योजना करतात, पण माझी मदत मागत नाहीत. ते इतर लोकांबरोबर मैत्रीचा करार करतात. पण माझ्या आत्म्याला तो नको असतो. हे लोक त्यांच्या पापात आणखी भर घालीत आहेत.

यशया 30:7

मिसरला काही अर्थ नाही. मिसरच्या मदतीला काही किंमत नाही. म्हणून मी मिसरला ‘स्वस्थ बसणारा रहाब’ असे म्हणतो.

यशया 30:15

परमेश्वर, माझा प्रभू, इस्राएलचा पवित्र देव म्हणतो, “तुम्ही मला शरण आलात, तर तुम्ही वाचाल. शांतता आणि विश्वास हीच तुमची शक्ती आहे.”पण तुम्हाला हेच नको आहे.

यशया 31:1

मदत मागण्यासाठी मिसरमध्ये जाणारे ते लोक पाहा ते घोडे मागतात. घोडे आपला बचाव करतील असे त्यांना वाटते. मिसरमधील रथ आणि घोडेस्वार आपल्याला वाचवतील असा या लोकांचा समज आहे. मिसरचे सैन्य मोठे असल्याने आपण सुरक्षित आहोत असेच त्यांना वाटते. हे लोक इस्राएलच्या पवित्र देवावर विश्वास ठेवत नाही. ते परमेश्वराची मदत मागत नाहीत.

यशया 47:10

तू दुष्कृत्ये केलीस आणि तरी तुला सुरक्षित वाटते. मनातल्या मनात म्हणतेस ‘माझी दुष्कृत्ये कोणालाच दिसत नाहीत.’ तुझे शहाणपण आणि ज्ञान तुला वाचवील असे तुला वाटते. ‘मीच एकमेव आहे. माझ्यासारखे महत्वाचे कोणी नाही’ असा विचार तू स्वत:शीच करतेस.

यिर्मया 13:25

तुमच्याबाबत माझी योजना ही अशी आहे आणि त्याचप्रमाणे गोष्टी घडतील.” हा परमेश्वराचा संदेश आहे.“हे असे का घडेल? कारण तुम्हाला माझा विसर पडला. तुम्ही खोट्या देवावर विश्वास ठेवला.

आमोस 2:4

परमेश्वर असे म्हणतो, “यहूदाने पुष्कळ अपराध केले असल्यामुळे मी यहूदाला शिक्षा करीन. का? कारण त्यांनी परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करण्यास नकार दिला. त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा मानल्या नाहीत. त्यांच्या पूर्वजांनी असत्यावर विश्वास ठेवला. यहूदाच्या लोकांनी परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देण्यास हे असत्यच कारणीभूत झाले.

लूक 10:16

जो शिष्यांचे ऐकतो तो माझे ऐकतो आणि जो शिष्यांना नाकारतो तो मला नाकारतो. आणि जो मला नाकारतो तो ज्याने मला पाठविले त्याला नाकारतो.”

1 थेस्सलनीकाकरांस 4:8

म्हणून जो कोणी हे शिक्षण नाकारतो, तो मनुष्याला नव्हे तर पवित्र आत्मा देणाऱ्या देवाला नाकारतो.

Interlinear

Choose Theme