“मग तुम्हांला पुढील कथा समजेल. एक माणूस त्याच्या उंचीच्या मानाने खूपच आखूड असलेल्या अंथरूणावर झोपायचा प्रयत्न करत होता. त्याचे पांघरूणसुध्दा त्याला पूर्ण पणे पांघरता येईल इतपत रूंद नव्हते. त्याचे अंथरूण आणि पांघरूण दोन्ही निरूपयोगी होती. अगदी त्याप्रमाणे तुमचे करार निरूपयोगी ठरलेले आहेत.”
Cross references
कायदे करणाऱ्यांनो, तुम्हाला तुमच्या कृत्याचा जाब द्यावा लागेल, तेव्हा तुम्ही काय सांगाल? दूरच्या देशातून तुमचा विध्वंस येत आहे. तेव्हा मदतीसाठी कोठे धावाल? तुमची धनसंपत्ती तेव्हा उपयोगी पडणार नाही.
मी तुमच्या ‘चांगुलपणाबद्दल’ आणि सर्व ‘धार्मिक’ कृत्यांबद्दल सांगू शकलो असतो पण त्या गोष्टीत काही अर्थ नाही.
विषारी सर्पाच्या अंड्यातून विषारी सर्पच निघतो. तसेच ते पापाला जन्म देतात. विषारी सर्पाचे अंडे तुम्ही खाल्ले तर तुम्ही मराल आणि ते तुम्ही फोडले तर त्यातून सर्पच निघेल.लोक खोट्या गोष्टी सांगतात-ह्या खोट्या गोष्टी कोळंयाच्या जाळ्याप्रमाणे असतात.
आम्ही सगळे पापांनी मळीन झालो आहोत. आमचा सर्व चांगुलपणा जुन्या मळलेल्या कपड्यांप्रमाणे आहे. आम्ही सर्व पिकल्या पानांप्रमाणे आहोत. आमच्या पापांनी आम्हाला, वारा जसा पाचोळा दूर वाहून नेतो, तसे दूर नेले आहे.
काही लोक बैलांना मारून होमार्पण देतात, पण ते लोकांनाही चोपतात ते लोक होमार्पण अर्पण करण्यासाठी मेंढ्या मारतात पण ते कुत्र्यांच्याही माना मुरगळतात. ते डुकराचे रक्त मला अर्पण करतात. ते लोक आठवणीने धूप जाळतात, पण ते त्यांच्या शून्य किंमतीच्या मूर्तीवरही प्रेम करतात. ते लोक त्यांचे स्वत:चे मार्ग निवडतात. माझे मार्ग निवडत नाहीत. ते त्यांच्या भयानक मूर्तीवर प्रेम करतात.
“पण तुम्ही ज्या लबाड्यांवर विश्वास ठेवत आहात, त्या लबाड्या कवडीमोलाच्या आहेत.
तर मग आपण काय म्हणावे? आम्ही असे अनुमान काढतो की, जे यहूदीतर देवाला अपेक्षित असलेल्या नीतिमत्वाच्या मागे लागले नव्हते त्यांना त्यांचे न्यायीपण विश्वासाचा परिणाम म्हणून मिळाले.
कारण ज्यांचा नाश होत आहे अशांसाठी वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, परंतु ज्यांचे तारण होत आहे, अशांसाठी तो देवाचे सामर्थ्य आहे.