“मी स्वत: परमेश्वर, त्या बागेची निगा राखीन. मी योग्य वेळी बागेला पाणी देईन. रात्रंदिवस मी त्या बागेची राखण करीन. कोणीही बागेची नासधूस करणार नाही.
Cross references
“मी सांगतो ते समजून घे. मी पृथ्वीवर जलप्रलय आणीन. मी पृथ्वीवरील सर्वलोक आणि सर्व सजीव प्राण्यांना नष्ट करीन.
“मी आता तुम्हाशी व तुमच्या मागे तुमच्या संततीशी एक करार करतो;
“हे यशुरुन! देवासारखा कोणी नाही. तुझ्या साहाय्यासाठी, मेघांवर आरुढ होऊन तो आपल्या प्रतापाने आकाशातून तुझ्या मदतीला येतो.
सज्जनांना तो आधार देतो. त्यांना लटपटू देत नाही. पण दुर्जनांचा संहार करतो. त्यांना गर्तेत ढकलतो दुर्जनांचे बळ अशा वेळी कुचकामी ठरते.
आजची माझी प्रार्थना आणि माझे मागणे परमेश्वर सतत लक्षात ठेवो. हा राजा त्याचा सेवक आहे. त्याच्यासाठी आणि इस्राएल लोकांसाठी त्याने एवढे करावे. एकदिवसही त्यात खंड पडू देऊ नये.
देव त्या शहरात आहे म्हणून त्याचा कधीही नाश होणार नाही देव सूर्योदयाच्या पूर्वीच मदत करेल.
तो सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्याबरोबर आहे. याकोबाचा देव ही आपली सुरक्षित जागा आहे.
देव तुला खाली पडू देणार नाही. तुझा पाठीराखा झोपी जाणार नाही.
मी माझा द्राक्षमळा उजाड करीन. कोणीही वेलीची काळजी घेणार नाही. कोणीही त्या मळ्यात काम करणार नाही. त्यात तण व काटेकुटे माजतील. तेथे पाऊस न पाडण्याची मी ढगांना आज्ञा करीन.”
पंगु हरणांप्रमाणे नाचतील. मुके आनंदगीते गाऊ लागतील. वाळवंटात झरे वाहू लागतील, तेव्हा असे होईल. कोरड्या जमिनीतून झरे वाहतील.
मी परमेश्वर तुझा देव आहे, मी तुझा उजवा हात धरतो आहे, मी तुला सांगतो: घाबरू नकोस मी तुला मदत करीन.
“मी तहानेलेल्यांसाठी पाण्याचा वर्षाव करीन. मी कोरड्या जमिनीवर झरे निर्माण करीन. मी तुझ्या संततीमध्ये माझा आत्मा घालीन. आणि वंशजांना आशीर्वाद देईन. ते वाहत्या पाण्याच्या झऱ्याप्रमाणे असतील.
तुम्ही जन्मल्यावर मीच तुम्हाला आधार दिला. आणि तुम्ही वृध्द झाल्यावर, तुमचे केस पिकल्यावरही मीच तुम्हाला आधार देईन, कारण मी तुम्हाला निर्माण केले. मी तुम्हाला आधार देतच राहीन व तुमचे रक्षण करीन.
पूर्वी घडलेल्या गोष्टी आठवा. मी देव आहे हे लक्षात ठेवा. दुसरा कोणताच देव नाही. ते खोटे देव माझ्यासारखे नाहीत.
“पाऊस वा बर्फ आकाशातून पडल्यावर पुन्हा आकाशात जात नाही तर तो जमीन भिजवितो, नंतर जमिनीतून रोपे अंकुरतात आणि वाढतात. त्यापासून शेतकऱ्यांना बी मिळते आणि लोकांना धान्य मिळते. धान्याची लोक भाकरी करतात.
परमेश्वर नेहमीच तुम्हाला मार्गदर्शन करील. ओसाड प्रदेशात तो तुमचा आत्मा तृप्त करील. तो तुमची हाडे मजबूत करील. भरपूर पाणी मिळणाऱ्या बागेप्रमाणे तुम्ही व्हाल. सतत वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे तुम्ही असाल.
राष्ट्रे तुला पाहिजे ती प्रत्येक गोष्ट देतील. हे म्हणजे मुलाने आईचे स्तनपान करावे तसे असेल.पण तू राजांच्या संपत्तीचे ‘पान’ करशील. मग तुला समजेल की तो मी आहे, जो तुला वाचवितो, तो परमेश्वर मी आहे. तुला कळेल की याकोबाचा महान देव तुझे रक्षण करतो.
परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “मी स्वत:च त्यांचा मेंढपाळ होईन. मी माझ्या मेंढ्यांचा शोध घेईन. मी त्यांच्यावर लक्ष ठेवीन.
मग मी, परमेश्वर व प्रभू, त्यांच्या देव होईन. माझा सेवक, दावीद राजा म्हणून त्यांच्यात राहील हे माझे परमेश्वराचे शब्द आहेत.
मी तुमच्यात माझा आत्माओतीन. म्हणजे मग तुम्ही पुन्हा जिवंत व्हाल. मग मी परमेश्वर असल्याचे कळेल. मी सांगितलेल्या गोष्टी मी घडवून आणल्या, हे ही तुमच्या लक्षात येईल.” परमेश्वरच हे सर्व बोलला.
मग इतर राष्ट्रांना कळून येईल की मी परमेश्वर आहे आणि इस्राएलमध्ये चिरंतन असे माझे पवित्र स्थान करुन त्या लोकांना मी माझी कायमची खास माणसे बनविली आहेत.”
माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो. आणि ती माझ्यामागे येतात.
मी खरा द्राक्षवेल आणि माझा पिता माळी आहे.