Home Bibles यशया 21:12 · मराठी बायबल
यशया 21:12 · मराठी बायबल

रखवालदार उत्तरला, “सकाळ होत आहे पण परत रात्र होईल. तुम्हाला काही विचारायचे असल्यास परत याव मग विचारा.”

Cross references

यशया 17:14

त्या रात्री सर्व माणसे अतिशय भयभीत होतील. उजाडण्यापूर्वी सर्व नष्ट झालेले असेल. त्यामुळे आमच्या शत्रूंना काहीही मिळणार नाही ते ह्या भूमीवर पाय ठेवतील तेव्हा येथे काहीही उरलेले नसेल.

यशया 55:7

दुष्टांनी दुष्टपणाने जगणे थांबवावे. त्यांनी वाईट विचार सोडून द्यावे. त्यांनी परमेश्वराला शरण यावे. मग परमेश्वर त्यांचे दु:ख हलके करील. आमचा देव क्षमाशील आहे म्हणून त्यांनी परमेश्वराला शरण जावे.

यिर्मया 42:19

“यहूदातील वाचलेल्या लोकांनो, ‘मिसरला जाऊ नका.’ असे परमेश्वराने तुम्हाला सांगितले आहे, मी आताच तुम्हाला ताकीद देतो.

यिर्मया 50:27

बाबेलमधल्या सर्व तरुण बैलांना (पुरुषांना) ठार करा. त्यांची कत्तल होऊ द्या. त्यांच्या पराभवाची वेळ आली आहे. त्यांचे फार वाईट होईल. ही त्यांच्या शिक्षेची वेळ आहे.

यहेज्केल 7:5

नंतर परमेश्वराने, माझ्या प्रभुने पुढील गोष्टी सांगितल्या. “एकापाठोपाठ एक अरिष्ट येईल.

यहेज्केल 7:10

“रोप उगवते व वाढते आणि त्याला फुले येतात, त्याप्रमाणे शिक्षेची ती वेळ आली आहे. देवाने खूण केली आहे. शत्रू तयार झाला आहे. शिक्षेला सुरवात होत आहे. हातातील काठीला अंकुर फुटले आहेत.गर्विष्ठ राजा (नबुखद्नेस्सर) अधिक तयार झाला आहे.

यहेज्केल 7:12

“ती शिक्षेची वेळ आली आहे. तो दिवस जवळच आहे. विकत घेणाऱ्यांना आनंद होणार नाही, विकणाऱ्यांना खेद वाटणार नाही. का? कारण प्रत्येकालाच ती भयंकर शिक्षा भोगावी लागले.

यहेज्केल 14:1

इस्राएलमधील काही वडीलधारी माणसे (नेते) माझ्याकडे आले. माझ्याशी बोलण्यासाठी ते बसले.

यहेज्केल 18:30

का? इस्राएलच्या लोकांनो, प्रत्येक माणसाच्या कर्माप्रमाणे मी त्या माणसाचा न्यायनिवाडा करतो.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,“म्हणून माझ्याकडे परत या. वाईट गोष्टी करण्याचे सोडून द्या. त्या भयंकर गोष्टींना, (मूर्तींना) तुम्हास पाप करण्यास, प्रवृत्त करु देऊ नका.

यहेज्केल 33:11

“मी शपथपूर्वक सांगतो ‘दुष्टांचे मरण मी इच्छिले नव्हते. मला त्यांनी मरावे असे अजिबात वाटत नाही. त्या पापी लोकांनी परत माझ्याकडे यावे असे मला वाटते. त्यांनी आपला मार्ग बदलावा म्हणजे त्यांना खरोखरीचे जीवन जगता येईल. तेव्हा माझ्याकडे परत या. दुष्कृत्ये करायचे सोडा. इस्राएलच्या लोकांनो, तुम्ही का मरावे?’ असे परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, असे तू त्या लोकांना सांगितले पाहिजेस.

प्रेषितांचीं कृत्यें 2:37

जेव्हा लोकांनी हे ऐकले, तेव्हा त्यांना फार फार दु:ख झाले. त्यांनी पेत्राला व इतर प्रेषितांना विचारले, “आम्ही काय करावे?”

प्रेषितांचीं कृत्यें 17:19

त्यांनी पौलाला धरले व अरीयपगाच्यासभेपुढे नेले ते म्हणाले, ‘तुम्ही आम्हांला जी नवी कल्पना शिकवीत आहात ती कृपा करुन स्पष्ट करुन सांगा.

प्रेषितांचीं कृत्यें 17:30

भूतकाळात लोक देवाला समजू शकले नाहीत पण देवाने त्याकडे दुर्लक्ष केले. पण आता, जगातील प्रत्येक व्यक्तीला देव सांगतो की, त्याने आपले ह्रदय व जीवन बदलावे.

Interlinear

Choose Theme