Home Bibles यशया 20:5 · मराठी बायबल
यशया 20:5 · मराठी बायबल

जे कुशकडे मदतीची अपेक्षा करीत होते. त्यांचा अपेक्षाभंग होईल. मिसरच्या वैभवाने लोक आश्चर्यचकीत झाले होते परंतु ते लज्जित होतील.”

Cross references

2 राजे 18:21

काठी म्हणून तू ज्याच्यावर रेलला आहेस तो तर मोडका बांबू आहे. ही काठी म्हणजे मिसर. माणूस अशा काठीवर विसंबून राहिला तर ती मोडून पडेल हातात रुतेल आणि क्लेश देईल लोक विश्वास ठेवतात तो मिसरचा राजा हा असा आहे.

यशया 2:22

जर तुम्हाला स्वत:चे रक्षण करायचे असेल तर तुम्ही दुसऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका. शेवटी ती माणसेच आहेत म्हणजेच मर्त्य आहेत. म्हणूनच त्यांना देवाप्रमाणे सामर्थ्यवान समजू नका.

यशया 30:3

“पण मी सांगतो की मिसरमध्ये लपण्याने तुमचा काही फायदा होणार नाही. मिसर तुमचे रक्षण करू शकणार नाही.

यशया 30:5

पण त्यांची निराशा होईल. त्यांना मदत करू न शकणाऱ्या देशावर ते विसंबले आहेत. मिसर काहीच उपयोगाचा नाही. मिसर काही मदत करणार नाही. उलट तो तुम्हाला लज्जित व ओशाळवाणे करील.”

यशया 30:7

मिसरला काही अर्थ नाही. मिसरच्या मदतीला काही किंमत नाही. म्हणून मी मिसरला ‘स्वस्थ बसणारा रहाब’ असे म्हणतो.

यशया 36:6

तू त्यासाठी मिसरवर विसंबतोस का? पण मिसर पिचलेल्या काठीसारखा आहे. तू त्याच्यावर आधारासाठी टेकलास तर तुला फक्त इजा होईल आणि तुझ्या हाताला जखम होईल. मिसरवर मदतीसाठी अवलंबून असलेले कोणीही मिसरचा राजा फारो याच्यावर भरवसा ठेवू शकत नाही.”

यिर्मया 9:23

परमेश्वर म्हणतो, “शहाण्यांनी त्यांच्या शहाणपणाबद्दल, बलवानांनी त्यांच्या बळाबद्दल व श्रीमंतांनी त्यांच्या पैशाबद्दल बढाई मारु नये.” असे परमेश्वर म्हणतो.

यिर्मया 17:5

परमेश्वर म्हणतो, “जे दुसऱ्या लोकांवर विश्वास ठेवतात, त्यांचे वाईट होईल. सामर्थ्यासाठी जे दुसऱ्यावर विसंबतात, त्याचे भले होणार नाही. का? कारण त्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवणे सोडून दिले.

यिर्मया 46:25

सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “लवकरच मी नोच्या आमोन देवतेला शिक्षा करीन. मी फारो, मिसर आणि तिचे दैवत यांनाही शिक्षा करीन. मी मिसरच्या राजाला सजा देईन आणि फारोवर अवलंबून असलेल्या लोकांना शिक्षा करीन.

यहेज्केल 29:6

मगच मिसरमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना कळून येईल की मीच परमेश्वर आहे.“मी ह्या गोष्टी का करीन.? कारण इस्राएलचे लोक मिसरवर अवलंबून होते. पण मिसर म्हणजे गवताचे कमकुवत पाते होता.

यहेज्केल 29:7

इस्राएलचे लोक मिसरवर विसंबले. पण मिसरने फक्त त्यांचे हात आणि खांदे विंधले. ते तुझ्या आधारावर राहिले. पण तू त्यांची पाठ मोडून पिरगळलीस.”‘

सफन्या 2:12

म्हणजे कूशींनो, (इथियोपियातील लोकांनो,) तुम्हीसुध्दा, बंर का? परमेश्वराची तलवार तुमच्या लोकांनाही मारील.

1 करिंथकरांस 3:21

म्हणून मनुष्यांविषयी कोणीही फुशारकी मारु नये. कारण सर्व गोष्टी तुमच्या आहेत.

Interlinear

Choose Theme