Home Bibles यशया 20:1 · मराठी बायबल
यशया 20:1 · मराठी बायबल

सर्गोन अश्शूरचा राजा होता. त्याने तर्तानला अश्दोदवर स्वारी करायला पाठविले. तर्तानने चढाई करून ते शहर जिंकून घेतले.

Cross references

1 शमुवेल 5:1

पलिष्ट्यांनी परमेश्वराचा कोश घेतला. तो एबन-एजर येथून अश्दोद येथे नेला.

1 शमुवेल 6:17

अशाप्रकारे पलिष्ट्यांनी आपल्या पापक्षालनार्थ परमेश्वराला गळवांच्या पाच सुवर्ण प्रतिमा दिल्या. प्रत्येक पलिष्टी गावातर्फे एक अशा त्या होत्या. अश्दोद, गज्जा, अष्कलोन, गथ, एक्रोन ही ती पाच गावे होत.

2 राजे 18:17

अश्शूरच्या राजाने मोठ्या सैन्यासोबत आपले तीन महत्वाचे सेनापती यरुशलेममध्ये राजा हिज्कीयाकडे पाठवले. तेव्हा ते लाखीश येथून यरुशलेमला निघाले. वरच्या तलावाच्या पाटापाशी ते उभे राहिले. (परिटाच्या शेताकडे जो रस्ता जातो त्या वाटेवर हा वरचा तलाव आहे)

2 इतिहास 26:6

उज्जीयाने पलिष्ट्यांबरोबर युध्द केले. गथ, यब्ने व अश्दोदचे कोट पाडून टाकले. अश्दोद जवळ व पलिष्ट्यांच्या वस्तीत इतरत्र उज्जीयाने नगरे वसवली.

यशया 14:31

नगरच्या वेशीजवळील प्रजाजनांनो, रडा. नगरवासीयांनो, आक्रोश करा. पलेशेथ मधील सर्व लोक भयभीत होतील. त्यांचे धैर्य गरम मेणाप्रमाणे वितळून जाईल. उत्तरेकडे पाहा! धुळीचा लोट उठला आहे. अश्शूरचे सैन्य येत आहे. त्या सैन्यातील सर्व माणसे बलवान आहेत.

यिर्मया 25:20

मी सर्व अरब व ऊस देशातील राजे यांनाही द्राक्षरस पिण्यास दिला. मी पलिष्ट्यांच्या देशातील अश्कलोन, गज्जा, एक्रोन या शहरांतील व अश्दोद शहरामधील उरलेले अशा सर्व राजांना त्या प्याल्यातून द्राक्षरस पिण्यास भाग पाडले.

यिर्मया 25:29

माझ्या नावाने प्रसिध्द असलेल्या यरुशलेम नगरीत वाईट गोष्टी घडवून आणण्यास मी अगोदरच सुरवात केली आहे. आपल्याला शिक्षा होणार नाही असे तुम्हाला वाटण्याचा संभव आहे. पण तुम्ही चुकता आहात. तुम्हाला शिक्षा होईलच. मी पृथ्वीवरील सर्व माणसांना मारण्यासाठी तलवारीला साद घालीत आहे.”‘ हा परमेश्वराचा संदेश आहे.

आमोस 1:8

अश्दोदच्या गादीवर बसणाव्याचा मी नाश करीन. अष्कलोनच्या राजदंड धारी राजाला मी नष्ट करीन. एक्रोनच्या लोकांना मी सजा देईन. मग अजूनही जिवंत असलेले पलिष्ट्यांचे लोक मरतील.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.

Interlinear

Choose Theme