Home Bibles यशया 2:13 · मराठी बायबल
यशया 2:13 · मराठी बायबल

जरी हे लोक लबानोनामधील उंच गंधसरूप्रमाणे वा बाशानमधील मोठ्या एला वृक्षांप्रमाणे असले तरी देव त्यांना शिक्षा करील.

Cross references

स्तोत्रसंहिता 29:5

परमेश्वराच्या आवाजामुळे खूप मोठा देवदारुवृक्ष तुकडे तुकडे होऊन पडतो. परमेश्वर लबोनानच्या देवदार वृक्षाचे तुकडे करतो.

यशया 10:33

लक्ष द्या. आपला प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर, प्रचंड वृक्ष (अश्शूर) कापून टाकील. आपल्या सामर्थ्याच्या बळावर देव हे करील. श्रेष्ठ व प्रतिष्ठित लोकांचे महत्व तो कमी करील.

यशया 14:8

तू दुष्ट राजा होतास. पण आता तू संपला आहेस. लबानोनमधील गंधसरू व सरूवृक्षसुध्दा आनंदित झाले आहेत. वृक्ष म्हणतात, “राजाने आम्हाला कापून टाकले होते. पण आता राजाच पडला आहे. तो आता कधीच उठणार नाही.”

यशया 37:24

परमेश्वर, माझ्या प्रभुविरूध्द बोलण्यासाठी तू तुझ्या नोकरांचा उपयोग केलास. तू म्हणालास, “मी फार सामर्थ्यवान आहे माझ्याजवळ पुष्कळ रथ आहेत माझ्या बळावर मी लबानोनला हरविले. मी तेथील उंच डोंगरावर चढलो. मी तेथील सर्व उंच झाडे (सैन्ये) तोडली, मी तेथील उंच डोंगरावर व घनदाट जंगलात जाऊन आलो.

यहेज्केल 31:3

अश्शूर सुंदर फांद्या असलेल्या व गर्द छाया असलेल्या लबानोनमधील उंच गंधसरुसारखा होता. त्याचा शेंडा ढगांना भिडला होता.

आमोस 2:5

म्हणून यहूदात आग लावीन. त्या आगीत यरुशलेमचे उंच मनोरे भस्मसात होतील.”

जखऱ्या 11:1

लबानोन, तू आपली दारे उघड म्हणजे अग्नी आत शिरुन तुझे गंधसरु जाळून टाकील.

जखऱ्या 11:2

गंधसरु उन्मळून पडले म्हणून देवदार आक्रोश करतील. ते प्रचंड वृक्ष दुसरीकडे नेले जातील. जंगलतोड पाहून बाशानचे अल्लोन वृक्ष आकांत करतील.

Interlinear

Choose Theme