Home Bibles यशया 19:7 · मराठी बायबल
यशया 19:7 · मराठी बायबल

नदीकाठची झाडे सुकतील, मरतील व वाऱ्यावर उडून जातील. नदीच्या रूंदट पात्रातील वनस्पतीसुध्दा मरतील.

Cross references

यशया 23:3

ते समुद्रमार्गे जाऊन धान्याचा शोध घेतात. नाईल नदीच्या तीरावर पिकलेले धान्य ते विकत घेतात आणि इतर राष्ट्रांत विकतात.

यशया 32:20

तुम्ही काहीजण प्रत्येक झऱ्याकाठी बी पेरा. तुमच्या गुरांना आणि गाढवंाना मोकळे सोडा. व तेथे चरू द्या. तुम्ही लोक खूप सुखी व्हाल.

यिर्मया 14:4

कोठेही पाऊस न पडल्यामुळे कोणीही पिकांसाठी जमिनीची मशागत करीत नाही.शेतकरी हवालदिल झाले आहेत त्यामुळे त्यांनी आपले चेहरे झाकून घेतले आहेत.

यहेज्केल 19:13

पण त्या वेलीला मुळापासून उपटून फेकून देण्यात आले. पूर्वेकडील उष्ण वाऱ्यांमुळे तिची फळे वाळली. मजबूत फांद्या मोडल्या, आणि त्या फांद्या आगीत टाकल्या गेल्या.

योएल 1:17

आम्ही बियाणे पेरले पण ते मातीतच सुकून मरून गेले. आमची झाडे वाळली व मेली आहेत. आमची धान्याची कोठारे रिकामी झाली आणि कोसळत आहेत.

Interlinear

Choose Theme