Home Bibles यशया 17:4 · मराठी बायबल
यशया 17:4 · मराठी बायबल

त्या वेळी याकोबाची (इस्राएलची) सर्व संपत्ती नष्ट होईल. आजारी माणसाप्रमाणे याकोब दुबळा व बारीक होईल.

Cross references

अनुवाद 32:15

“पण यशुरुन (इस्राएल) माजला आणि उन्मत्त बैलासारखा लाथा झाडू लागला. खाऊन पिऊन तो धष्ट पुष्ट झाला! आणि त्याने आपल्या कर्त्या देवाचा त्याग केला! आपले तारण करणारा दुर्गासारखा परमेश्वर तुच्छ मानला.

2 राजे 17:3

अश्शूरचा राजा शल्मनेसर होशेवर चाल करुन आला. तेव्हा होशे शल्मनेसरचा मांडलीक बनला. त्याला होशेने आपले रक्षण करावे म्हणून कर दिला.

2 राजे 17:6

होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन हस्तगत केले. इस्राएल लोकांना त्याने कैद करुन अश्शूरला नेले. त्यांना त्याने हलहा येथे तसेच गोजानमधील हाबोर नदीजवळ आणि मेदीलोकांच्या नगरात ठेवले.

यशया 9:8

याकोबाच्या (इस्त्राएलच्या) लोकांविरूध्द माझ्या परमेश्वराने आज्ञा दिली आहे. ती खरी ठरेल.

यशया 9:21

(मनश्शे एफ्राईमशी आणि एफ्राईम मनश्शेशी लढेल व नंतर दोघेही युहदाच्या विरोधात उभे राहतील.)परमेश्वर अजूनही इस्राएलवर रागावला आहे. तो तेथील लोकांना शिक्षा करण्याच्या तयारीत आहेत.

यशया 10:4

कैद्याप्रमाणे तुम्हाला वाकावे लागेल, मृताप्रमाणे तुम्हाला जमिनीवर पडावे लागेल. पण एवढ्यानेही भागणार नाही. कारण अजूनही देवाचा राग शांत झाला नसेल. अजूनही देव शिक्षा करण्याच्या तयारीत असेल.

यशया 10:16

अश्शूर स्वत:ला श्रेष्ठ समजतो पण सर्वशक्तिमान परमेश्वर एक भयानक रोग अश्शूरमध्ये पसरवील. ज्याप्रमाणे रोगी माणसाचे वजन घटते, त्याप्रमाणे अश्शूरचे वैभव व सामर्थ्य घटेल. नंतर अश्शूरचे वैभव नष्ट होईल. तो रोग सर्वभक्षक आगीप्रमाणे असेल.

यशया 24:13

सुगीच्या काळात, लोक जैतूनची फळे झाडावरून पाडतात. पण काही झाडावर राहतातच. अनेक देशांमध्ये असलेल्या ह्या देशाचे देखील असेच होईल.

यशया 24:16

जगाच्या कानाकोपऱ्यातून देवाचे स्तुतिस्तोत्र आपल्याला ऐकायला येतील. ह्या गीतांतून खऱ्या देवाची स्तुती असेल. पण मी म्हणतो, “पुरे पुष्कळ झाले. मी ज्या गोष्टी पाहतो त्या भयानक आहेत. लोकांच्या विरूध्द विश्वासघातकी उठले आहेत. व त्यांना त्रास देत आहेत.

यहेज्केल 34:20

म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, त्यांना म्हणतो, “मी स्वत: लठ्ठ मेंढी आणि बारीक मेंढी ह्यांच्यात निवाडा करीन.

आमोस 3:12

परमेश्वर म्हणतो, “जर सिंहाने मेंढीवर हल्ला केला, तर कदाचित मेंढपाळ तिला वाचवायचा प्रयत्न करील. पण तो मेंढीचा काही भागच वाचवू शकेल. तो कदाचित् मेंढीचे दोन पाय वा कानाचा तुकडाच सिंहाच्या तोंडातून ओढून काढेल. त्याचप्रकारे इस्राएलमधील बहुतांश लोक वाचणार नाहीत. शोमरोनमध्ये राहणारे लोक शय्येचा एखादा कोपरा किंवा बिछान्याच्या कापडाचा तुकडाच फक्त वाचवू शकतील.”

सफन्या 2:11

ते लोक परमेश्वराला घाबरतील. का? कारम परमेश्वर त्यांच्या दैवतांचा नाश करील. मग दूरदूरच्या प्रदेशांतील सर्व लोक परमेश्वराची उपासना करु लागतील.

Interlinear

Choose Theme